Monday, July 6, 2026

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर (Flood in Indrayani) आल्याने आळंदी शहरात जाणे सध्या सुरक्षित नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून (CMO) जारी करण्यात आलेल्या आवाहनात सांगण्यात आले आहे की, ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहेत तेथेच सुरक्षित थांबावे. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत आळंदीकडे जाण्याचे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Flood in Indrayani)

प्रशासनाने वारकऱ्यांना आळंदीऐवजी पुणे शहरात होणाऱ्या वारीमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला आहे. तसेच (Flood in Indrayani) इंद्रायणी नदीपात्र, घाट परिसर आणि सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे. (Flood in Indrayani)

दरम्यान, संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. (Flood in Indrayani)

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >