मुंबई : मुंबई, नवी मुंबई आणि रायगड परिसरात गुरुवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा (Heavy Rain) जोर शुक्रवारीही कायम आहे. नवी मुंबई, पनवेल आणि रायगड पट्ट्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, दक्षिण मुंबई आणि उपनगरांमध्येही पहाटेपासून पावसाने जोर धरला आहे. याचा परिणाम रस्ते वाहतूक (Road Traffic) आणि लोकल रेल्वे (Local Train) सेवांवर झाला आहे.
घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीची स्थिती तपासूनच प्रवास करावा. सध्या मध्य (Central), पश्चिम (Western) आणि हार्बर (Harbour) या तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा सुरू असल्या, तरी अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत.
मध्य रेल्वे (Central Railway) अपडेट
कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि सीएसएमटी ते कल्याण या अप (Up) व डाउन (Down) मार्गावरील लोकल गाड्या सुमारे १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबई : मुंबईत (Mumbai) सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर कायम असून अनेक सखल ...
पश्चिम रेल्वे (Western Railway) अपडेट
चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट या अप (Up) व डाउन (Down) मार्गावरील लोकल गाड्याही १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
हार्बर लाइन (Harbour Line) अपडेट
सीएसएमटी ते पनवेल आणि पनवेल ते सीएसएमटी या अप (Up) व डाउन (Down) मार्गावरील हार्बर (Harbour) लाइनच्या लोकल गाड्या ५ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत.
महापालिकेतील अभियंत्यांच्या संघटनेने निलंबन मागे घेण्याची केली मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : चेंबूर येथील झाड दुघर्टनेनंतर रस्ते विभागाच्या दोन ...
रस्ते वाहतुकीवरही परिणाम
सततच्या पावसामुळे रस्ते वाहतूक (Road Traffic) संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांनी अतिरिक्त वेळ राखून घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अंधेरी सबवे (Andheri Subway) वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम
मुसळधार पावसाचा परिणाम लांब पल्ल्याच्या (Long-distance) रेल्वे गाड्यांवरही झाला आहे. सीएसएमटी ते कल्याण मार्गावरून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या धावत असल्याने मध्य रेल्वेच्या फास्ट (Fast) लोकल गाड्यांचे वेळापत्रक (Timetable) विस्कळीत झाले आहे. परिणामी लोकल सेवांमध्ये विलंब वाढला असून, स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे.




