Amit Satam Viral Video : अमित साटम यांच्या 'त्या' व्हिडिओवरून वाद; नेमकं काय घडलं?

मुंबई : मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन दुर्दैवी घटना घडल्या. या घटनेचे पडसाद विधिमंडळात दिसले. याच सुमारास एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओवरून वाद उफाळला. (Amit Satam Viral Video)


व्हायरल झालेल्या व्हिडीओत भाजपा आमदार अमित साटम दिसले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर जोरदार टीका केली.या व्हायरल व्हिडिओवर अमित साटम यांनी स्पष्टीकरण देत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचा दावा केला आहे.



गेल्या काही दिवसांत मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळणे आणि उघड्या मॅनहोलमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान या दोन्ही घटनांवर विधिमंडळात चर्चा झाली. याचवेळी विधिमंडळ परिसरातील अमित साटम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यातील संवादाचा एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये "काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं..." असे बोलून हसत असल्याचा अमित साटम यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावरून सोशल मीडियाविश्वातून टीकाटीप्पणी सुरू झाली. अनेकांनी अशा गंभीर घटनांवर लोकप्रतिनिधींनी संवेदनशीलता दाखवावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. विरोधकांनीही या व्हिडिओवरून साटम यांच्यावर निशाणा साधला.



दरम्यान, अमित साटम यांनी स्पष्टीकरण दिले. व्हिडीओचा चुकीचा अर्थ काढला जात असून संपूर्ण संदर्भ न पाहता तो व्हायरल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात ३६ हजार कंपन्या बंद झाल्याचा दावा धादांत खोटा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्योग आणि नवीन नोंदणीत महाराष्ट्रच देशात प्रथम

Kalyan Power Cut : कल्याण ते बदलापूर वीजपुरवठा बंद; ‘या’ भागांत सकाळी ६ ते ११ पर्यंत शटडाऊन

कल्याण : कल्याण, डोंबिवली परिसरासह टिटवाळा, अंबरनाथ आणि बदलापूरमधील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ 'एमक्यू-९ रीपर' नष्ट

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिके

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत