Thursday, July 2, 2026

Kurla Manhole News : मॅनहोल्सवरून आयुक्तांना उपमहापौरांना केले टार्गेट

Kurla Manhole News : मॅनहोल्सवरून आयुक्तांना उपमहापौरांना केले टार्गेट

दीड महिन्यांपूर्वी आयुक्तांनी दिले होते उपायुक्त,सहायक आयुक्तांना निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कुर्ल्यातील खैरानी रोडवरील मॅनहोल्समध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर उपमहापौर संजय घाडी यांनी आपण याकरता १५ जून रोजी आयुक्तांना पत्र देवून याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे याप्रकरणी आयुक्तच जबाबदार असून आयुक्तांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली. परंतु महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी १५ मे २०२५ रोजी घेतलेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मुंबईतील रस्त्यांवरील सर्व मॅनहोल्सची तपासणी करून जिथे जाळ्या नसतील तिथे जाळ्या लावून घ्याव्यात तसेच झाकणे तुटलेली असतील तर त्याही बदलून घ्यावीत अशाप्रकारच्या निर्देश दिले होते. त्यामुळे उपमहापौरांच्या पत्राच्या आधीच आयुक्तांनी सर्व परिमंडळ उपायुक्त तसेच विभागाचे सहायक आयुक्तांना निर्देश दिल्यामुळे याप्रकरणी याची अंमलबजावणी न केल्यामुळे सकृत दर्शनी प्रशासनाने याची जबाबदारी स्वीकारुन चार जणांना निलंबित केले आहे.

मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांसह महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांची भेट घेवून उघड्या मॅनहोल्समध्ये पडून मृत्यू झालेल्या आणि चेंबूरमधील झाड दुघर्टनेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी केली. यामध्ये महापौरांच्या समक्ष मॅनहोल्समध्ये एक अधिकारी पडल्यानंतर आपण स्वत: आयुक्तांना निवेदन देवून मुंबईतील मॅनहोल्सची तपासणी करून जाळ्या आणि झाकणे लावण्यात याव्या अशा प्रकारची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने उपमहापौरांनी आपल्या निवेदनानंतरही प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली. यावर बोलतांना घाडी यांनी दोन वर्षांपूर्वी मॅनहोल्समध्ये बसवलेल्या जाळ्यांचे कंत्राट संपलेले आहे. त्यातच आजही आयुक्त हे ३ हजार मॅनहोल्समध्ये जाळ्या नसल्याचे सांगत असल्याचेही घाडी यांनी सांगून जर आजही मुंबई सुरक्षित नसल्याचे सांगितले. त्यामुळे भविष्यात अपघात होवू शकतो. म्हणून राजीनाम्याची आम्ही मागणी केली असून भविष्यात जर अपघात झाला तरी मी स्वत: राजीनामा देईन आणि आयुक्तांनीही द्यावा,असेही स्ष्ट केले.

उपमहापौरांनी १५ जून रोजी पत्र दिले असले तरी महापालिका आयुक्तपदाची सुत्रे होती घेतल्यानंतर आश्विनी भिडे यांनी मार्च २०२६ पासून मासिक आढावा सभा घेवून विविध कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली. त्या अंतर्गत १६ मे रोजी आयुक्तांनी घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत पहिला विषय हा रस्त्यांवरील उघडी मॅनहोल्स आणि त्यामध्ये बसवण्यात येणाऱ्या जाळ्या व झाकणांचा होता. यामध्ये आयुक्तांनी सर्व विभागाच्या उपायुक्तांसह सहायक आयुक्तांना तातडीने तपासणी करून मॅनहोल्सची तुटलेली झाकणे बसवणे आणि जाळ्या बसवण्याचे काम युध्द पातळीवर हाती घेतले होते. त्यामुळे घाडी यांच्या निवेदनापूर्वी आयुक्तांनी याबाबत निर्देश दिल्यामुळे घाडी यांची मागणी वेगळ्या हेतूसाठी झाली आहे का प्रश्न निर्माण होत आहे. उपमहापौरांच्या मागणीबाबत प्रसारमाध्यमांनी आयुक्तांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, कुठल्याही कामाला प्रशासन जबाबदार आहे. परंतु वैयक्तिक आयुक्त तसेच उपायुक्त जबाबदार असू शकत नाही. ते प्रत्येक ठिकाणी जावून काम पाहू शकत नाही. याबाबत आढावा बैठक घेवून योग्य ते निर्देश देत संबंधित अधिकाऱ्यांकडून काम करून घेत असतात. मॅनहोल्समध्ये जाळ्या आहेत की नाही हे तपासून त्या बसवून घेण्याचे निर्देश दिल्यानंतर ते करून न घेण्यात दुर्लक्ष केल्यामुळे तसेच सुरक्षेच्या कामांमध्ये निष्काळजीपणा दाखवला म्हणून प्राथमिक स्वरुपात चार जणांना निलंबित केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >