Thursday, July 2, 2026

Ketan Agrawal Murder case : केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; भावाला १० कोटींची नोटीस, नेमकं काय आहे प्रकरण ?

Ketan Agrawal Murder case : केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; भावाला १० कोटींची नोटीस, नेमकं काय आहे प्रकरण ?

पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder case) प्रकरणात आता सिया गोयलच्या (Siya Goyal) कायदेशीर प्रतिनिधित्वावरून नवा वाद निर्माण झाला आहे. ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याला १० कोटींची मानहानीची नोटीस पाठवली आहे.

आशुतोष श्रीवास्तव यांनी दावा केला की, सिया गोयलने सर्व आवश्यक कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करून त्यांना अधिकृतपणे वकील म्हणून नियुक्त केले असून संबंधित वकालतनामा न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. तसेच उच्च न्यायालयातही तिचे प्रतिनिधित्व करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

मात्र, सियाचा (Siya Goyal) भाऊ साहिल गोयल यांनी हा दावा फेटाळून लावत, "आम्ही आशुतोष श्रीवास्तव यांना कधीही नियुक्त केलेले नाही," असे स्पष्ट केले. यामुळे या प्रकरणात नेमके सियाचे अधिकृत वकील कोण, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, दुसरे वकील विपुल दुशिंग यांनीही ते आणि त्यांची टीम सियाचे प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर प्रतिनिधित्वावरून वाद अधिकच चिघळला आहे.

याचवेळी, पुणे ग्रामीण पोलिसांकडून केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून, लोहगड किल्ल्यावर घटनास्थळाची पुनर्रचना करण्यात आली आहे. पोलिसांच्या मते, आरोपींनी गुन्ह्यापूर्वी घटनास्थळाची पाहणी आणि कथित 'सराव' केल्याचा तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >