सिया-चेतनच्या कथित नात्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; तपासाला नवे वळण?
पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder Case) प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असतानाच आता आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचे कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमुळे प्रकरणाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
समोर आलेल्या एका कथित व्हिडिओमध्ये सिया गोयल पबमध्ये बिअरची बाटली हातात घेऊन फोनवर बोलताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. दुसऱ्या कथित व्हिडिओमध्ये सिया आणि चेतन एका कॅफेमध्ये एकत्र बसून जवळीक दाखवत असल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
Ram Gopal Kothari : राम गोपाल कोठारी ठरले 'व्होल्केनो मॅरेथॉन' पूर्ण करणारे पहिले भारतीय
नवी दिल्ली : कोलकात्याचे उद्योजक आणि धावपटू राम गोपाल कोठारी (Ram Gopal Kothari) यांनी जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताच्या नावे नवा विक्रम नोंदवला आहे. चिली येथील ...
दरम्यान, केतन अग्रवाल यांच्या आईने यापूर्वी सिया मद्यपान करत असल्याची माहिती त्यांच्यापासून लपविण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हे कथित व्हिडिओ समोर आल्याने चर्चेला अधिक उधाण आले आहे.
मात्र, हे व्हिडिओ नेमके कधीचे आणि कुठले आहेत, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच या व्हिडिओंची अधिकृत पडताळणी झालेली नसून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे त्यातील दाव्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
Maharashtra Rain Alert : हवामान विभागाचा इशारा: राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढचे १०० तास महत्त्वाचे
पुढील आठवड्यात महाराष्ट्रात दमदार पाऊस
मुंबई : पुणे वेधशाळेने ५ ते ७ जुलैदरम्यान महाराष्ट्रभर समाधानकारक ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून अनेक ...
लोहगड हत्याकांड : आरोपींना घटनास्थळी नेऊन पुराव्यांची पडताळणी
लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयाने ३ जुलैपर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी सकाळी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपी चेतन चौधरी याला कडेकोट बंदोबस्तात लोहगड किल्ल्यावर नेऊन घटनाक्रम पुन्हा उभा केला. या वेळी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि तपास पथक घटनास्थळी उपस्थित होते.
तपासादरम्यान आरोपीकडून घटनास्थळावरील विविध बाबींची पडताळणी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेतून घटनेचा नेमका क्रम, आरोपींच्या हालचाली आणि उपलब्ध पुराव्यांची तपासणी करण्यात आली. केतन अग्रवालचा १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे मानले जात होते. मात्र पुढील तपासात हा अपघात नसून पूर्वनियोजित कटातून घडवून आणलेला खून असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणात केतन अग्रवालसोबत लोहगडावर गेलेली त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिला मुख्य आरोपी करण्यात आले असून, तिचा मित्र चेतन चौधरी यालाही सहआरोपी करण्यात आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही आरोपींनी मिळून केतन अग्रवालला दरीत ढकलल्याची कबुली तपासादरम्यान दिल्याचेही समोर आले आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून, घटनास्थळावरील पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पुढील कार्यवाही सुरू आहे.