Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले. हरित महाराष्ट्र आयोगाच्या वृक्षारोपण मोहिमेच्या आढावा बैठकीत त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ग्रामपंचायतींचे नियोजन आणि खासगी-सार्वजनिक भागीदारीवर भर देण्याचे सांगितले.


मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक ग्रामपंचायतीने उपलब्ध जमिनीचे नियोजन करून ग्रामसभेच्या ठरावाद्वारे वृक्षलागवडीचा आराखडा तयार करावा. हा आराखडा केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड केल्यास वृक्षलागवडीसाठी आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. (Harit Maharashtra)



राज्यातील उपलब्ध जमिनींची जीआयएस आधारित लँड बँक तयार करण्यात आली असून ती जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी जिल्हानिहाय नियमित आढावा घेऊन शासनाला अहवाल सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.


वृक्षलागवडीसाठी ड्रोन, उपग्रह तंत्रज्ञान आणि जीआयएस प्रणालीचा वापर करून रोपांचे रिअल-टाइम निरीक्षण करण्यात येणार आहे. लागवड केलेल्या रोपांची वाढ आणि स्थिती सहा महिन्यांपर्यंत अचूकपणे तपासण्यासाठी विशेष यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.



वन विभागाकडे सध्या सुमारे ६ कोटी रोपे उपलब्ध असून पुढील वर्षापर्यंत ही क्षमता १० कोटी रोपांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. यासाठी खासगी रोपवाटिकांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांमार्फतही मोठ्या प्रमाणावर रोपांची निर्मिती सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.


Comments
Add Comment

Pune news : पुणेकरांच्या खिशाला झळ! रिक्षा भाडेवाढीसह ई-रिक्षा आणि शेअर रिक्षेबाबत मोठे निर्णय

पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत पुणे शहर आणि परिसरातील वाहतुकीशी संबंधित अनेक महत्त्वाचे

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची तडकाफडकी बदली

- अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अहवालानंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास

Gadchiroli : गडचिरोली सर्पदंश प्रकरणात संबंधित आश्रम शाळेचा परवाना रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; पुढील 3 तासांसाठी हवामान विभागाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) काही भागांमध्ये आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा