Labour Minister Adv. Akash Fundkar : माथाडी कामगारांच्या समस्यांवर समन्वयाने तोडगा काढावा

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश


महिंद्रा लॉजिस्टिक्समधील कामगारांच्या मागण्यांबाबत बैठक


मुंबई : मे. महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड, चाकण येथील माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या, वेतनवाढ, थकीत मजुरी तसेच कामगारांच्या विविध तक्रारींच्या अनुषंगाने कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. माथाडी कामगारांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील असून संबंधित सर्व संघटनांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे निर्देश मंत्री श्री फुंडकर यांनी यावेळी दिले.



बैठकीत संबंधित आस्थापनांमध्ये कार्यरत माथाडी कामगारांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव, थकीत मजुरीची वसुली, कामगारांच्या नोंदणीची स्थिती तसेच रोजगाराशी संबंधित विविध मुद्द्यांचा सविस्तर आढावा मंत्री श्री फुंडकर यांनी घेतला. कामगारांच्या तक्रारींची वस्तुनिष्ठ पडताळणी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.यावेळी मंत्री श्री फुंडकर (Minister Shri Phundkar) म्हणाले, कामगारांचे हित जपणे आणि कामगारांना न्याय मिळवून देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. त्याअनुषंगाने कामगारहित डोळ्यासमोर ठेवून आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून नियमानुसार पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री श्री फुंडकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.बैठकीस उपसचिव (Worker) स्वप्निल कापडणीस, दिलीप वणिहिरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सहाय्यक कामगार आयुक्त एन. ए. वाळके यांच्यासह संबंधित अधिकारी, पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे प्रतिनिधी तसेच कंपनीचे प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.