मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले. हरित महाराष्ट्र आयोगाच्या वृक्षारोपण मोहिमेच्या आढावा बैठकीत त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ग्रामपंचायतींचे नियोजन आणि खासगी-सार्वजनिक भागीदारीवर भर देण्याचे सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक ग्रामपंचायतीने उपलब्ध जमिनीचे नियोजन करून ग्रामसभेच्या ठरावाद्वारे वृक्षलागवडीचा आराखडा तयार करावा. हा आराखडा केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड केल्यास वृक्षलागवडीसाठी आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. (Harit Maharashtra)
नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे दुरुस्तीची मोहीम राबवा मुंबई : विविध हवामान संस्थांनी या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये 'एल निनो'बाबत दिलेल्या इशाऱ्यांबाबत ...
राज्यातील उपलब्ध जमिनींची जीआयएस आधारित लँड बँक तयार करण्यात आली असून ती जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी जिल्हानिहाय नियमित आढावा घेऊन शासनाला अहवाल सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
वृक्षलागवडीसाठी ड्रोन, उपग्रह तंत्रज्ञान आणि जीआयएस प्रणालीचा वापर करून रोपांचे रिअल-टाइम निरीक्षण करण्यात येणार आहे. लागवड केलेल्या रोपांची वाढ आणि स्थिती सहा महिन्यांपर्यंत अचूकपणे तपासण्यासाठी विशेष यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश महिंद्रा लॉजिस्टिक्समधील कामगारांच्या मागण्यांबाबत बैठक मुंबई : मे. महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड, चाकण ...
वन विभागाकडे सध्या सुमारे ६ कोटी रोपे उपलब्ध असून पुढील वर्षापर्यंत ही क्षमता १० कोटी रोपांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. यासाठी खासगी रोपवाटिकांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांमार्फतही मोठ्या प्रमाणावर रोपांची निर्मिती सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.






