एखादे मूल शाळेत जाताना, एखादा वृद्ध रस्ता ओलांडताना किंवा एखादी महिला कामावर जाताना सुरक्षितपणे घरी परतेल याची खात्री जर समाजाला देता येत नसेल, तर त्या समाजाच्या प्रगतीच्या दाव्यांचे मूल्य काय? आज आपल्या शहरांमध्ये वाहनांसाठी जागा वाढत आहे; पण माणसासाठीची जागा कमी होत चालली आहे. अशा वेळी सर्वोच्च न्यायालयाने सुरक्षितपणे चालणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे ठामपणे सांगत केवळ एक निर्णय दिलेला नाही, तर समाजाला आरसा दाखवला आहे.
भारत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वेगाने धावत आहे. देशभरात उंच उड्डाणपूल उभे राहत आहेत, महामार्गांचे जाळे विस्तारत आहे, मेट्रो मार्ग शहरांच्या भूगोलाला नवी दिशा देत आहेत, ‘स्मार्ट सिटी’च्या संकल्पनाही प्रत्यक्षात उतरत आहेत; परंतु या विकासाच्या झगमगाटामागे एक अस्वस्थ करणारे वास्तव दडलेले आहे. विकासाच्या या वेगवान शर्यतीत सामान्य माणूस, विशेषतः पायी चालणारा नागरिक, मागे पडत चालला आहे. रस्ते रुंद होत आहेत; पण माणसासाठीची जागा मात्र अरुंद होत असून देशातील रस्ते अपघातांची आकडेवारी या वास्तवाची साक्ष देते. भारतात दररोज सरासरी १,२०० हून अधिक अपघात होतात आणि सुमारे ५०० नागरिकांना जीव गमवावा लागतो. यामध्ये दररोज शंभराच्या आसपास पादचाऱ्यांचा मृत्यू होतो. वर्षभरात हा आकडा ३६ हजारांहून अधिक असतो! महाराष्ट्रही या शोकांतिकेतून सुटलेला नाही. २०१९ ते २०२४ या कालावधीत महाराष्ट्रात हजारो पादचाऱ्यांचा मृत्यू झाला असून पादचाऱ्यांच्या मृत्यूबाबतीत राज्य देशात अग्रक्रमावर आहे. ही केवळ आकडेवारी नाही; तर विकासाच्या मॉडेलमधील मानवी दुर्लक्षाचा रक्तरंजित दस्तऐवज आहे.
Nashik : राज्यात नवीन वीज जोडण्यांसाठी सुमारे ₹४,००० कोटींची तरतूद करण्यात आली असून, उद्योगांसाठी नवीन वीज जोडणीचा खर्च महावितरणमार्फत (Mahavitaran) केला जाणार ...
दरम्यान पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देशासमोर किती गंभीर आहे, याची जाणीव सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या महत्त्वाच्या निर्णयातून झाली. कर्नाटकमधील एका पाच वर्षांच्या चिमुरड्याचा शाळेत जाताना भरधाव टँकरखाली चिरडून मृत्यू झाला. त्या रस्त्यावर ना फुटपाथ होता, ना सुरक्षित पादचारी मार्ग. एका कुटुंबाच्या आयुष्यावर कोसळलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने अखेर सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने केवळ नुकसानभरपाई वाढवून दिली नाही, तर एक मूलभूत तत्त्व अधोरेखित केले, सुरक्षितपणे चालणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे; रस्ते केवळ वाहनांसाठी नाहीत, ते माणसांसाठीही आहेत. हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानातील अनुच्छेद २१ अर्थात जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा व्यापक अर्थ स्पष्ट केला. न्यायालयाने नमूद केले की, जीवनाचा अधिकार म्हणजे केवळ श्वास घेण्याचा अधिकार नसून सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि भीतीमुक्त जगण्याचा अधिकार आहे. सुरक्षितपणे चालता येणे हा त्याच अधिकाराचा अविभाज्य भाग आहे.
Nashik : देशात स्वच्छ आणि परवडणाऱ्या ऊर्जेला चालना देणाऱ्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ची (Pradhan Mantri Surya Ghar Free Electricity Scheme) माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत ...
खरं तर फुटपाथ हा फक्त काँक्रीटचा पट्टा नसतो. तो नागरी संस्कृतीचा आणि लोकशाही मूल्यांचा प्रतिबिंब असतो. श्रीमंत-गरीब, वाहनधारक-वाहन नसलेला, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, सर्वांना समानतेने वापरता येणारी ही सार्वजनिक जागा असते. म्हणूनच जगात फुटपाथ ही सर्वाधिक लोकशाहीवादी नागरी सुविधा मानली जाते. दुर्दैवाने आपल्या शहरांमध्ये फुटपाथवर अतिक्रमणे, बेकायदा पार्किंग, विक्रेते किंवा काही ठिकाणी फुटपाथच नसल्याचे चित्र दिसते. परिणामी नागरिकांना वाहनांच्या रहदारीतून जीव धोक्यात घालून चालावे लागते. विकासाच्या नावाखाली आपण वाहनकेंद्रित शहरांची निर्मिती केली. उड्डाणपुलांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले गेले; पण पादचारी मार्ग मात्र दुर्लक्षित राहिले. वाहनांच्या वेगाला प्राधान्य देताना मानवी सुरक्षेला दुय्यम स्थान दिले गेले. ही मानसिकता बदलल्याशिवाय ‘विकसित’ची संकल्पना अपुरी राहील. यासाठी प्रत्येक रस्ते प्रकल्पात सुरुवातीपासूनच पादचाऱ्यांसाठी सुरक्षित सुविधा अनिवार्य करणे आवश्यक आहे. याच कारणामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत दूरगामी मानला जात आहे. आता प्रत्येक राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, राष्ट्रीय व राज्य महामार्ग प्राधिकरण आणि शहर नियोजन करणाऱ्या यंत्रणांवर पादचाऱ्यांसाठी सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्याची घटनात्मक जबाबदारी अधिक स्पष्ट झाली आहे. भविष्यात फुटपाथ नसणे, झेब्रा क्रॉसिंगचा अभाव, अतिक्रमण किंवा निष्काळजी नियोजनामुळे अपघात झाल्यास संबंधित यंत्रणांची जबाबदारी न्यायालयात निश्चित होण्याचा मार्ग अधिक खुला झाला आहे.
मुंबई : लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुचर्चित 'श्री शिवराज अष्टक' (Shivraj Ashtak) चित्रपट मालिकेतील सातवे चित्रपुष्प 'दर्याभवानी' (Daryabhavani) चा ...






