Saturday, June 27, 2026

Digpal Lanjekar's 'Daryabhavani' Movie : 'श्री शिवराज अष्टक'मधील सातवे चित्रपुष्प 'दर्याभवानी'; दमदार टीझरने वाढवली उत्सुकता!

Digpal Lanjekar's 'Daryabhavani' Movie : 'श्री शिवराज अष्टक'मधील सातवे चित्रपुष्प 'दर्याभवानी'; दमदार टीझरने वाढवली उत्सुकता!

मुंबई : लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुचर्चित 'श्री शिवराज अष्टक' (Shivraj Ashtak) चित्रपट मालिकेतील सातवे चित्रपुष्प 'दर्याभवानी' (Daryabhavani) चा बहुप्रतीक्षित टीझर (Teaser) प्रदर्शित झाला आहे. मराठा आरमाराचे (Maratha Navy) पहिले प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्य, धैर्य आणि समुद्रावरील वर्चस्वाची दमदार झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय आरमाराचे जनक (Father of the Indian Navy) म्हणून गौरवले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी बलाढ्य मराठा आरमाराची उभारणी केली. त्याच सागरी सामर्थ्याचा वारसा पुढे नेत मराठा आरमाराचे पहिले प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी परकीय सत्तांविरुद्ध समुद्रावर मराठ्यांचा दबदबा कायम ठेवला. 'दर्याभवानी' या चित्रपटातून त्यांच्या याच शौर्यगाथेचा भव्य इतिहास मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

टीझरमध्ये समुद्रातील युद्ध, विशाल जहाजे, तोफांचा मारा आणि भव्य व्हिज्युअल्स (Visuals) यांची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या ऐतिहासिक कथनशैलीची झलक टीझरमधून स्पष्ट दिसून येते. त्यामुळे चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

'दर्याभवानी' हा 'श्री शिवराज अष्टक' मालिकेतील सातवा चित्रपट असून, यापूर्वी प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी मराठा आरमाराचे वैभव आणि कान्होजी आंग्रे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले असून निर्मिती श्री तिरुपती बालाजी चित्र, प्रकाश पाटील, डॉ. अशोक जीवतोडे आणि एलीव्हेट फिल्म्स (Elevate Films) यांनी केली आहे. चित्रपटात अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे आणि अजय पूरकर यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

'दर्याभवानी' हा ऐतिहासिक चित्रपट १५ जानेवारी २०२७ रोजी राज्यभर आणि देशभरातील चित्रपटगृहांमध्ये (Theatres) प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >