व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर दिलासादायक बातमी समोर आली आहे. ला ग्वायरा परिसरात कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अवघ्या १८ दिवसांच्या नवजात बाळाला आणि त्याच्या आईला बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. या थरारक बचाव मोहिमेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून जगभरातून बचाव पथकांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. (Venezuela Earthquakes)
बचाव कर्मचाऱ्यांनी अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ढिगारा हटवत आई आणि बाळापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार केला. दोघांनाही सुरक्षित बाहेर काढल्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात बचाव पथकांचे स्वागत केले. त्यानंतर आई आणि बाळाला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Venezuela Earthquakes)
दरम्यान, व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये सलग ७.२ आणि ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन शक्तिशाली भूकंप झाल्याने मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अवघ्या ४० सेकंदांच्या अंतरात शहरातील २५० हून अधिक इमारती जमीनदोस्त झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. अनेक निवासी इमारती, व्यावसायिक संकुले आणि सार्वजनिक इमारतींचे मोठे नुकसान झाले असून हजारो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Venezuela Earthquakes)
पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया गोयलच्या बचाव पक्षाने तिच्याविरोधात ...
प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार, देशभरात ३९ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, लष्कर, अग्निशमन दल आणि स्वयंसेवी संस्था युद्धपातळीवर बचावकार्य राबवत आहेत. जड यंत्रसामग्रीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून जीवंत व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष प्रशिक्षित श्वानपथके आणि अत्याधुनिक उपकरणांचाही वापर केला जात आहे. (Venezuela Earthquakes)
भूकंपानंतरचे अनेक हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत आहेत. काही ठिकाणी नागरिक स्वतःच आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी ढिगारा हटवताना दिसत आहेत, तर अनेक जखमींवर रस्त्याच्या कडेला उभारलेल्या तात्पुरत्या वैद्यकीय शिबिरांमध्ये उपचार सुरू आहेत. हजारो नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला असून प्रशासनाकडून अन्न, पिण्याचे पाणी आणि अत्यावश्यक मदत साहित्याचे वितरण सुरू आहे. (Venezuela Earthquakes)
मुंबई : मुंबईत किरकोळ कारणावरून होणाऱ्या हिंसक घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नालासोपारा लोकलमध्ये झालेल्या ...
दरम्यान, नुकसानाचे अचूक मूल्यांकन करण्याचे काम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. बचाव पथके अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत असून प्रत्येक जिवाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. (Venezuela Earthquakes)






