Nashik : राज्यात नवीन वीज जोडण्यांसाठी सुमारे ₹४,००० कोटींची तरतूद करण्यात आली असून, उद्योगांसाठी नवीन वीज जोडणीचा खर्च महावितरणमार्फत (Mahavitaran) केला जाणार आहे. तसेच 'वीज निरंतर' योजनेअंतर्गत आगामी कुंभमेळ्यापूर्वी (Nashik Kumbh Mela) नाशिक जिल्ह्यात ७,००० नवीन वितरण रोहित्रे ((Transformers)) बसविण्यात येणार असून, २० वर्षांहून अधिक जुनी रोहित्रे टप्प्याटप्प्याने बदलण्यात येणार आहेत, अशी माहिती महावितरणचे नवनियुक्त संचालक (संचालन) धनंजय औंढेकर (Dhananjay Aundhekar) यांनी दिली.
FIFA World Cup : सध्या जगभरात फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचा उत्साह सुरु आहे. याचाच गैरफायदा घेत ऑनलाइन सट्टा चालवणाऱ्या आंतरराज्यीय बेटिंग रॅकेटचा(Interstate betting racket) नाशिक ...
नवीन वीज जोडण्यांसाठी ४,००० कोटी
धनंजय औंढेकर यांनी महावितरणच्या आगामी योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यात नवीन वीज जोडण्यांसाठी सुमारे ₹४,००० कोटींची तरतूद करण्यात आली असून, उद्योगांसाठी नवीन वीज जोडणीचा खर्च महावितरणमार्फत केला जाणार आहे.तसेच 'वीज निरंतर' योजनेअंतर्गत आगामी कुंभमेळ्यापूर्वी नाशिक जिल्ह्यात ७,००० नवीन वितरण रोहित्रे (Transformers) बसविण्यात येणार असून, २० वर्षांहून अधिक जुनी रोहित्रे (Old transformers) टप्प्याटप्प्याने बदलण्यात येणार आहेत.
Nashik : देशात स्वच्छ आणि परवडणाऱ्या ऊर्जेला चालना देणाऱ्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ची (Pradhan Mantri Surya Ghar Free Electricity Scheme) माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत ...
महावितरणच्या सर्व सेवा पूर्णपणे ऑनलाइन
वीज चोरी रोखण्यासाठी मोबाईल एमएसईबी (MSEB) पथके कार्यरत करण्यात येणार असून, महावितरणच्या सर्व सेवा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. ग्राहकांची वीजबिले मुख्यालयातून २४ तासांच्या आत तयार होऊन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज वापर, गळती, अनियमित वापर तसेच इतर महत्त्वाची माहिती ग्राहकांना थेट मोबाईलवर उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी (Dhananjay Aundhekar) स्पष्ट केले.
व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर दिलासादायक बातमी समोर आली आहे. ला ग्वायरा परिसरात कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अवघ्या ...
राज्यातील सध्याचा २७,००० मेगावॅटचा पीक वीजभार पुढील तीन वर्षांत १६,००० मेगावॅटपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे औंढेकर (Dhananjay Aundhekar) यांनी सांगितले. त्यासाठी बॅटरी एनर्जी स्टोरेज (Battery Energy Storage) या आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी सुरू असून, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील भेंडा येथे २० मेगावॅट क्षमतेचा बॅटरी स्टोरेज प्रकल्प कार्यरत आहे. भविष्यात उपकेंद्र स्तरावरही ही प्रणाली सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास सुमारे दोन तास अखंड वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. असे त्यांनी सांगितले.
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा), आयमा, महाराष्ट्र चेंबर, लघु उद्योग भारती, मास्मा आदी विविध औद्योगिक व व्यापारी संघटनांच्या (Industrial and trade associations) पदाधिकाऱ्यांकडून निमा हाऊस येथे महावितरणचे नवनियुक्त संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.





