मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभा या महिन्याला चार किंवा पाच घेण्याची प्रथा असली तरी या महापालिकेत अभ्यासू नगरसेवकांना आपल्या प्रभागांतील समस्या मांडण्यास कमी वेळ मिळत असल्याने यासाठी सभागृहाचे कामकाज काही दिवस वाढवण्यात यावे अशी मागणी सर्वच पक्षांच्या गटनेत्यांकडून केली जात आहे. त्यामुळे यापुढे महापालिका सभागृहाच्या कामकाजासाठी कायमस्वरुपी निश्चित दिवस करण्याचा विचार असून यासाठी दर सोमवारी आणि गुरुवारी महापालिका सभा घेण्यावर एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई महापालिकेच्या मागील सभेमध्ये काँग्रेसचे अश्रफ आझमी सभागृहाच्या कामकाजाचे दिवस वाढवण्याची मागणी केली. यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी अनेक नगरसेवकांना सभागृहात बोलण्यास संधी मिळत नाही, ही वस्तूस्थिती आहे. आपण महासभा चार ते पाच वेळा करतो. त्यातच प्रभाग समिती, विशेष समिती आणि वैधानिक समित्यांच्या बैठकांच्या तारखांचाही घोळात घोळ असतो. यापेक्षा सभागृहाच्या कामकाजाचे दोन ते तीन दिवस वाढवा. एखाद दिवस वाढवून ठरावाच्या सूचनांसाठी दिला जावू शकतो, हरकतीच्या दिवसांसाठी एक दिवस दिल्यास नगरसेवकांना आपल्या प्रभागातील समस्या मांडता येवू शकतात. त्यामुळे एक दिवस हरकतीच्या मुद्दयांसाठी राखून ठेवला जावा अशी सूचना करताना प्रभाग समित्यांच्या बैठकांबाबत महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विचार केला जावा अशी विनंती केली.
तर उबाठाचे यशोधर फणसे यांनी पूर्वी महापालिका सभा या सोमवारी व गुरुवारी भरायच्या. तर बुधवारी स्थायी समितीची बैठक असायची. त्यामुळे लोकांना नगरसेवकांच्या बैठकींची माहिती असायची अणि त्याप्रमाणे ते शाखेवर भेटायला यायचे. त्यामुळे पुन्हा एकदा सोमवार आणि गुरुवारी या दिवशीच महापालिकेच्या सभांचे आयोजन करण्याची मागणी त्यांनी केली.
मुंबई : मुंबईतील मध्य रेल्वेचा (Central Railway) रविवारी, २८ जून रोजी विविध अभियांत्रिकी (Engineering) आणि देखभाल (Maintenance) कामांसाठी मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. या ...
शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच प्रभाग समितीच्या बैठका घ्याव्यात. तसेच या महिन्याचे सभागृह संपल्यानंतर पुढील महिन्याचा कार्यक्रम ठरवायला हवा असे सांगितले.
विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी यापूर्वी जेवढे म्हणून महापालिका चिटणीस होवू गेले त्यांचा प्रभाग समित्यांच्या बैठकांसंदर्भात समन्वय असायचा. तसा समन्वय राखला गेला पाहिजे असे सांगितले.
यावर महापौर रितू तावडे यांनी, प्रभाग समितीच्या विषयासंदर्भात सचिव विभागाने महिन्याच्या सुरुवातीला व्हर्चुअल बैठक घ्यावी, त्यांचे वेळापत्रक ठरवणे योग्य होईल, हे वेळापत्रक त्याप्रमाणे निश्चित केले पाहिजे असे निर्देश दिले.
नियोजन सोमवार तसेच गुरुवारचेच..
दरम्यान, सभागृहनेत्यांनी विरोधी पक्षाला विश्वासात घेत यापुढील महापालिका सभा या तीन आठवडे सोमवार आणि गुरुवारीच घेण्यात येईल अशाप्रकारे नियोजन करण्याचा विचार केला आहे. त्यानुसार, पुढील जुलै महिन्यात या सभा आता दर सोमवारी व गुरुवारीच होणार आहे.
त्यादृष्टीकोनातून जुलै महिन्यातील सभा या १३, १६, २० व २३ या तारखेला घेण्याचा निश्चित केले आहे. महापालिका सचिव विभागाच्या एका निवृत्त विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार विभागाच्यावतीने सोमवारी व गुरुवारचेच नियोजन असते. परंतु बऱ्याचदा सत्ताधारी पक्षाचे कार्यक्रम, सुट्टया या पाहून त्यात बदल केला जातो.
बेलफास्ट : बेलफास्ट (Belfast) येथे झालेल्या पहिल्या टी-२० (T20) सामन्यात आयर्लंडने (Ireland) विश्वविजेता (World Champion) भारताचा (India) ३४ धावांनी पराभव (Defeat) करत इतिहास (History) रचला. ...
सभागृहाला पहिली सभा बंधनकारक…
महापालिका अधिनियम ११८८नुसार महिन्याला एक सभा बंधनकारक असून ज्या सभेचे नोटीफिकेशन झाले आहे, ती सभा रद्द करता येत नाही. या व्यतिरिक्त महापौर या आपल्या अधिकारात कितीही सभा घेवू शकतात. त्यामुळे महिन्याला दहा ते पंधरा सभाही त्यांना घेण्यास कुठेही बंधन नाही. बंधन आहे ते पहिली सभा रद्द न करणे यालाच,असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.





