Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार पाऊस पडला. मात्र गेल्या दोन दिवसापासून पावसाच्या सरी पुन्हा मंदावल्या. यंदा पावसाचं आगमन उशिरा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चितेंच वातावरण आहे. प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मान्सूनने गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा हैरान करून सोडलं आहे. अशातच हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आली आहे.राज्यात 2 जुलैपासून मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.



अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात अनेक ठिकाणी पावसाने पाठ फिरवली आहे. आतापर्यंत विदर्भात पाऊस कमी पडण्याचं प्रमाण 50 ते 60 टक्क्यांवर पोहोचल्याचं प्रादेशिक हवामान विभागाने एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं आहे. अल निनोमुळे जून महिन्यात राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण घटले आहे. जूनमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडला आहे.



२ जुलै नंतर धो धो पाऊस
राज्यात 2 जुलैपासून धो धो पाऊस बरसणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.या दिवसापासून राज्यभरात नियमित आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. जूनमध्ये राज्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणे अपेक्षित असते. परंतु,'अल निनो'चा प्रभाव असल्याने राज्यातल्या अनेक भागात पाऊस कमी झालास, अशी माहिती प्रादेशिक हवामान खात्याच्या रिसर्चमध्ये समोर आली आहे.राज्यात 2 जुलैपासून मुसळधार पाऊस सर्वदूर नियमित होईल. असेही प्रादेशिक हवामान खात्याचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम