John Abraham : जॉन अब्राहमची क्रिकेटमध्ये एन्ट्री ! जॉन अब्राहम आता 'या' टीमचा झाला मालक

John Abraham Enters in Cricket : अभिनेता शाहरुख खान तसेच अभिनेत्री प्रीती झिंटा यांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमने क्रिकेटच्या दुनियेत मोठं पाऊल टाकलं आहे. जॉन अब्राहमने युरोपियन टी २० प्रीमियर लीगमधील एख फ्रेंचायजी खरेदी केली आहे. तो आता ETPL मधील रॉटरडॅम डॉकर्सचा सहमालक झाला आहे. जॉन अब्राहम सोबतच आता क्रिकेट जगतातील दिग्गज जाँटी ऱ्होड्स, फाफ ड्युप्लेसिस, क्लासने आणि मॅनेजिंग पार्टनर म्हणून मधुकर श्री देखील सामील झाले आहेत.


रॉटरडॅम डॉकर्स 26 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2026 (ETPL) दरम्यान आयोजित होणाऱ्या युरोपियन टी20 प्रीमियर लीगच्या (ईटीपीएल) पहिल्याच हंगामात स्पर्धा करणाऱ्या सहा फ्रँचायझी संघांपैकी एक आहे. जॉन अब्राहम एका नामांकित मालकी आणि नेतृत्व गटामध्ये सामील झाला आहे. या गटामध्ये मॅनेजिंग पार्टनर (व्यवस्थापकीय भागीदार) मधुकर श्री यांच्यासोबत जाँटी रोड्स, फाफ डू प्लेसिस आणि हेनरिक क्लासेन या दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे.



जॉन अब्राहम रॉटरडॅम संघात सहमालक झाल्यानंतर म्हणाला की, 'क्रिकेट लोकांना जोडणे, प्रेरित करणे आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. जॉनच्या मते युरोप सध्या क्रिकेटसाठी एक वेगाने वाढती बाजारपेठ आहे. रॉटरडॅम डॉकर्सकडे एक तगडे व्हिजन, नेतृत्व आणि मोठी महत्वकांक्षा आहे. यामुळं या फ्रेंचायजीची एक खास ओळख निर्माण होऊ शकते, असं त्याच मत आहे.


दरम्यान, ETPL मध्ये एडिनबर्ग, ग्लासगो, अॅमस्टरडॅम, डब्लिन, बेलफास्ट आणि रॉटरडॅम या 6 शहरातील संघांचा समावेश आहे. ही लीग संपूर्ण युरोपमधील क्रिकेटपटूसाठी एक नवीन आणि रोमांचक अध्याय सुरु करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. या लीगमध्ये एकूण 32 सामने खेळले जातील. ही लीग नवीन तयार होणाऱ्या युरोपियन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठ्या दिग्गजांसोबत खेळण्यासाठी जागतीक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देतील सोबतच आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्समध्ये क्रिकेट या खेळाला प्रोत्साहन मिळू शकणार आहे.

Comments
Add Comment

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत