- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट
- गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क तर्कसंगत करण्याचीही विनंती
मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेऊन विविध महत्त्वाच्या प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी देण्याची मागणी केली. शिवाय गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क तर्कसंगत करण्याची विनंतीही यावेळी त्यांनी केली.
महाराष्ट्र सागरी मंडळाने 'सागरमाला २.०' अंतर्गत बंदराधारित विकास, मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी, किनारी व अंतर्गत जलमार्ग, सागरी पर्यटन तसेच किनारी समुदायांच्या सामाजिक-आर्थिक विकासाशी संबंधित विविध प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. या सर्व व्यवहार्य प्रकल्पांना तातडीने मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी मंत्री नितेश राणे यांनी या बैठकीत केली.
- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट मुंबई : मासेमारी व्यवसायाला ...
यासोबतच, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टी क्रमांक ५ वर आकारण्यात येणारे प्रति प्रवासी ९२.०४ रुपयांचे शुल्क तर्कसंगत करून फेरी ऑपरेटर आणि सर्वसामान्य प्रवाशांवरील आर्थिक भार कमी करावा, असा मुद्दाही त्यांनी बैठकीत उपस्थित केला. मंत्री राणे यांच्या या दोन्ही मागण्यांवर केंद्रीय मंत्र्यांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
दरम्यान, या दिल्ली दौऱ्यात मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.