Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) राज्यातील २३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा (Rain) जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


कोकण (Konkan) विभागात पावसाचा जोर कायम राहणार असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह (Thunderstorm), वादळी वाऱ्यांसह हलका ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विशेषतः सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.



पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


मराठवाड्यात (Marathwada) छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून सर्व संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.


उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. विदर्भात (Vidarbha) अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.



हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, तर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात, त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने