Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी ठरत आहे. मात्र या लाडक्या बहिणींच्या पैश्यांवर काही भावांनी डल्ला मारल्याच्या घटना उघडकीस येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील असाच एक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Ladki Bahin Yojana)



५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख


राज्य सरकारने २८ जून २०२४ रोजी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुती व्हावी या हेतूने या योजनेसाठी मान्यता दिलेली. मात्र या योजनेचा फायदा पुरुषांनी घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल ५२३ जणांनी हा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. ही रक्कम तब्बल ७४ लाख ७५ हजार रुपये आहे. जिल्ह्यात त्याची वसुली करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र यातील काहीजणांचा अद्यापही शोध लागलेला नाही. (Ladki Bahin Yojana)



लाडक्यांची शोधमोहीम सुरु


राज्यसरकारच्या महत्त्वकांक्षी योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या पुरुषांची आता शोधमोहीम सुरू आहे. काही जणांचा पत्ता लागला असून, त्यांच्याकडून वसुलीसाठी सरकारी कर्मचारी हेलपाटे घालीत आहेत. अर्ज करताना जो निवासाचा पत्ता दिला होता, त्या पत्त्यावर संबंधित लाभ घेणारी व्यक्ती नसल्याचे समजते. त्यामुळे वसुलीसाठी अडचण निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ही योजना सुरू झाली त्यावेळी १२ लाख ४१ हजार ८७६ अर्ज आले होते. त्यातून ११ लाख २६ हजार ६५२ अर्ज मंजूर करण्यात आले. (Ladki Bahin Yojana)



नेमके काय झाले ?


लाडकी बहीण योजनेचे अर्ज करताना काहींनी चुकीची माहिती दिली. अर्ज करताना काहींनी पतीचे किंवा मुलाचे आधारकार्ड किंवा बँकेची माहिती दिली. काही महिलांकडून अनावधानाने अथवा अज्ञानामुळे ही कृती झाली, तर काहींनी जाणीवपूर्वक ही माहिती भरली. छाननीदरम्यान त्यांचे हे कृत्य उघडकीस आले आहे. यातील काही महिला अर्जदार असूनही त्याच्या नावापुढे पुरुष लिहिले गेल्याचीही उदाहरणे आहेत.

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा