Strait of Hormuz : ३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली ; तेल, वायू अन् खतांचा जहाजात समावेश, २० हून अधिक जहाजे रांगेत

३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली


नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका यांच्यातील सामंजस्य करारामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याची 'जीवनरेखा' मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.आतापर्यंत भारताशी संबंधित ३० जहाजांनी या मार्गावरून सुरक्षित प्रवास केला आहे, तर २६ जहाजे अद्याप आखाती प्रदेशात प्रतीक्षेत आहेत. प्रवास केलेल्या ३० जहाजांमध्ये एलपीजी, एलएनजी, कच्चा तेल आणि खते/बल्क कार्गोचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या करारानंतर जहाजांच्या हालचाली दुप्पट झाल्या असून, ही फेब्रुवारीनंतरची सर्वोच्च पातळी आहे.



या मार्गावरून जगातील २०% तेल आणि वायू पुरवठा होतो. तणाव कमी झाल्यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतीत घट झाली असून भारताच्या ऊर्जा आयातीला मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या अमेरिका-इराण चर्चेवर जागतिक सागरी व्यापाराची पुढील स्थिरता अवलंबून आहे.
Comments
Add Comment

US Immigration News : अमेरिकेत मोठा भूकंप! ट्रम्प सरकारचा दणका, 2 लाख परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द होण्याची शक्यता

अमेरिकेत आश्रय घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या सुमारे 2 लाख परदेशी नागरिकांचे B1 आणि B2 व्हिसा रद्द करण्याच्या तयारीत

Unrest in Pakistan : बलुचिस्ताननंतर आता ‘सिंधुदेश’च्या मागणीने जोर पकडल्याने देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात आणि सुरक्षेत सध्या मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK)

Hindu family murdered in Bangladesh : बांगलादेशात हिंदू कुटुंबातील चौघांची हत्या; याबा सेवनाला विरोध केल्याचा पोलिसांचा दावा, दोन्ही आरोपींचा कबुलीजबाब

रंगपूर : बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार सदस्यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. माचुआपारा

US Military Casualties : इराणविरुद्धच्या युद्धात १८ सैनिकांचा मृत्यू आणि ७५६ जवान जखमी, अमेरिकेने दिली माहिती

वॉशिंग्टन डीसी : इराण विरुद्धच्या युद्धात सहा महिन्यांत १८ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या युद्धात ७५६ जवान

Earthquake in Japan : जपानमध्ये ५.९ रिश्टर स्केलचा भूकंप, अनेक जखमी

टोकियो : जपानमध्ये रविवारी मध्यरात्री दोन वाजता कांटो प्रदेशात ५.९ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली.

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर