Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल


मुंबई : "महाराष्ट्रात उपजीविका करायची असेल, तर मराठी भाषेशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा दूत ठरतो," अशा शब्दांत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला' मिळालेल्या यशाचा गौरव केला. या अभियानाअंतर्गत राज्यभरातील १ लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यावहारिक मराठीचे धडे यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, उर्वरित चालकांनीही १५ ऑगस्टपूर्वी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरनाईक यांनी केले.



परिवहन विभागाने घेतलेल्या या विशेष आढावा बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण, मुंबई मराठी साहित्य संघ तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या या अभियानाला अमराठी बांधवांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राज्यभरात एका लोकचळवळीच्या रूपात राबवले जात आहे.



१ मेपासून सुरू झालेल्या या राज्यव्यापी अभियानाचा औपचारिक समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी चालकांना अधिकृत प्रमाणपत्रांचे वाटप केले जाईल. परिवहन विभागाने १५ ऑगस्टपर्यंत उर्वरित सर्व अमराठी चालकांना हे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व