Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या भरावाचा काही भाग खचल्याच्या गंभीर घटनेची दखल अखेर केंद्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, दोषी आढळणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आणि संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.



दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट


सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या भरावाचा काही भाग अचानक खचल्याने या प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेनंतर खासदार स्मिता वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली होती. यानंतर खासदार स्मिता वाघ यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.


त्यांच्या निवेदनाची गंभीर दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी तातडीने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. चौकशीत संबंधित कंत्राटदार दोषी आढळल्यास त्याला तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्यात येणार असून, या कामासाठी जबाबदार अधिकारी आणि संबंधित व्यक्तींवरही कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहेत. निकृष्ट दर्जाची कामे कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.



दोषींवर कोणती कारवाई होणार ?


दरम्यान, बायपासवरील भराव खचल्याच्या घटनेनंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) , जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil), आमदार सुरेश भोळे (MLA Suresh Bhole) , महापौर दीपमाला काळे (Mayor Deepmala Kale), जिल्हाधिकारी रोहन घुगे (District Collector Rohan Ghuge) आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (Superintendent of Police Shrikant Dhivare) यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर राष्ट्रीय महामार्गावरील कामांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकशी अहवालात नेमके कोण जबाबदार ठरतात आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे आता जळगावसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे मुंबई : महाराष्ट्राचा

Devendra Fadnavis : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुटकेसाठी केंद्राशी चर्चा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; कुटुंबीयांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे

Chandrashekhar Bawankule : अमरावतीतील सर्व मोठ्या आस्थापनांचे फायर ऑडिट होणार; महिनाभरात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण (Fire Audit) आणि आग प्रतिबंधक

Navnath Ban : MPSC पेपरफुटी प्रकरणावरून नवनाथ बन यांचा रोहित पवारांवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणावरून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस

MPSC Paper Leak : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणात भाजप-शरद पवार गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षा पेपरफुटी पेपरफुटीप्रकरणात भाजप

Jalgaon : हदयद्रावक ! झोका घेताना चिमुकल्याच्या गळ्याला दोरीचा फास लागला अन् क्षणात होण्याचं नव्हतं झालं

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद (Nashirabad) येथे हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरातील झोपाळ्यावर खेळताना झोक्याच्या