नवी दिल्ली : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आर. माधवन(R.madhavn) यांना २३ जून रोजी केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरविले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माधवन यांना हा सन्मान प्रदान केला. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आर. माधवन यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर सोशल मीडियातून अभिनंदनाच्या कमेंटचा वर्षाव केला. माधवन यांच्या कार्याची आणि कामगिरीची चर्चा होत असताना, त्यांच्या घड्याळानेही लक्षणीय लक्ष वेधून घेतले. आर. माधवन यांनी ४० ते ५० लाख रुपये किमतीचे लिमिटेड-एडिशन घड्याळ पुरस्कार सोहळ्यावेळी परिधान केले होते.
काय आहे ४० लाखाच्या घड्याळात ?
आर. माधवन यांच्या ४० लाख रुपयांच्या घड्याळात १८-कॅरेट रोझ गोल्ड केस आणि जयपूरच्या हवा महलपासून प्रेरित लघुचित्र असलेला मार्बल डायल आहे. हे लिमिटेड एडिशन घड्याळ(clock) आहे. विशेष म्हणजे जगभरात अशी केवळ १० घड्याळे उपलब्ध असून, त्यापैकी एक माधवन यांच्याकडे आहे. हे घड्याळ टायटन नेबुला जलसा रेंजमधील आहे.
सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय; उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती मुंबई : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक ...
पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर आर. माधवन यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
पुरस्कार मिळाल्यानंतर आर. माधवन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या. त्यांनी लिहिले, "पद्मश्री(padmshri) पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल मी अत्यंत नम्र, कृतज्ञ आणि खरोखरच सन्मानित झालो आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या या पुरस्काराने मला गौरविल्याबद्दल मी भारत सरकारचे मनःपूर्वक आभार मानतो. माझी शिफारस केल्याबद्दल आणि माझ्या प्रवासावर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचाही तितकाच आभारी आहे. हा सन्मान माझ्यासाठी नेहमीच एक अनमोल आठवण राहील. ज्यांनी माझे चित्रपट पाहिले, माझ्या भूमिकांना आपलेसे केले, माझे यश साजरे केले, माझ्या उणिवांना क्षमा केली आणि वर्षानुवर्षे माझ्या पाठीशी उभे राहिले—हा सन्मान जितका माझा आहे, तितकाच तुमचाही आहे. तुमच्या प्रेमाने मला माझ्या आयुष्याच्या आणि कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर पुढे जाण्याची प्रेरणा दिली आहे."
मुंबई : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ला हा देशाच्या इतिहासातील सर्वात वेदनादायी घटनांपैकी एक मानला जातो. या हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडलेला दहशतवादी ...
ते पुढे म्हणाले, "आज मला जबाबदारीची जाणीवही होत आहे. हा सन्मान मला आठवण करून देत राहील की प्रत्येक विशेषाधिकारासोबत एक मोठी जबाबदारी येते. सचोटी, नम्रता आणि मूल्यांचे रक्षण करणे, ज्या चित्रपटसृष्टीने मला सर्व काही दिले आहे, त्यामध्ये अर्थपूर्ण योगदान देणे आणि माझ्या देशाची शक्य त्या मार्गाने सेवा करणे. मी हा सन्मान चित्रपटसृष्टीच्या जादुई दुनियेला, माझ्यासोबत काम केलेल्या प्रत्येक कलाकाराला आणि तंत्रज्ञाला, आणि माझ्या कुटुंबाला समर्पित करतो, जे माझे सामर्थ्य आहे... मनःपूर्वक आभार. जय हिंद."





