फुटबॉलविश्वातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याने २०३० फिफा (2030 FIFA) विश्वचषकात खेळण्याबाबत अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या सुरू असलेल्या FIFA विश्वचषक २०२६ स्पर्धेत अर्जेंटिनासाठी दमदार कामगिरी करणाऱ्या मेस्सीने भविष्यातील योजनांबाबत प्रतिक्रिया देताना आपण सध्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले. (Lionel Messi)
३८ वर्षीय मेस्सीच्या नेतृत्वाखाली गतविजेते अर्जेंटिना राष्ट्रीय फुटबॉल संघ (Argentina national football team) यांनी विश्वचषक २०२६ मध्ये शानदार सुरुवात केली आहे. अल्जेरियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मेस्सीने हॅट्ट्रिक झळकावत अर्जेंटिनाला ३-० असा विजय मिळवून दिला. त्यानंतर ऑस्ट्रियाविरुद्धच्या सामन्यात त्याने दोन गोल करत संघाच्या २-० विजयात मोलाची भूमिका बजावली. (Lionel Messi)
या दोन सामन्यांमधील पाचही गोल मेस्सीच्या नावावर जमा झाले असून, त्याने विश्वचषकातील एकूण गोलसंख्या १८ वर नेली आहे. यासह तो FIFA विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा पुरुष फुटबॉलपटू ठरला आहे. आगामी २०३० विश्वचषकात खेळण्याबाबत विचारले असता मेस्सी म्हणाला, “मी अजून काही काळ खेळत राहीन. जोपर्यंत मी संघासाठी योगदान देऊ शकतो, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे आणि सहकाऱ्यांना मदत करू शकतो, तोपर्यंत मैदानावर उतरत राहीन.” (Lionel Messi)
फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) स्पर्धेतील साखळी फेरी (Group Stage) आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. गुरुवार (२५ जून) पासून तिसऱ्या आणि अखेरच्या फेरीतील सामने ...
मात्र २०३० विश्वचषकाबाबत त्याने कोणतीही ठोस हमी दिली नाही. “सध्या मी त्याबद्दल विचार करत नाही. तो अजून खूप दूरचा विषय आहे. मी एकावेळी एक दिवस जगतो आणि सध्या फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित करत आहे,” असे मेस्सीने स्पष्ट केले. (Lionel Messi)
विशेष म्हणजे २०३० मध्ये होणाऱ्या विश्वचषकावेळी मेस्सी ४२ वर्षांचा असेल. त्यामुळे तो त्या स्पर्धेत सहभागी होणार की नाही, याबाबतची उत्सुकता कायम आहे. मात्र त्याच्या ताज्या वक्तव्यानंतर चाहत्यांना आशेचा किरण मिळाला आहे. दरम्यान, अर्जेंटिनाने सलग दोन विजयांसह बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले असून, आता त्यांचा पुढील सामना जॉर्डनविरुद्ध होणार आहे. मेस्सीचा सध्याचा फॉर्म पाहता अर्जेंटिना पुन्हा एकदा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. (Lionel Messi)
मियामी : मियामी येथे झालेल्या FIFA World Cup 2026 च्या ग्रुप C मधील अखेरच्या सामन्यात ब्राझीलने (Brazil) स्कॉटलंडचा (Scotland) ३-० अशा फरकाने पराभव करत 'राऊंड ऑफ ३२'मध्ये (Round of 32) ...
मेस्सीचा कारकिर्दीचा प्रवासही तितकाच दैदिप्यमान राहिला आहे. २०२२ च्या FIFA विश्वचषकासह कोपा अमेरिका, फायनालिसिमा आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक अशी अनेक मोठी जेतेपदे त्याने अर्जेंटिनासाठी जिंकली आहेत. क्लब फुटबॉलमध्येही त्याने एफसी बार्सिलोना, पॅरिस सेंट-जर्मेन (FC Barcelona), (Paris Saint-Germain) आणि इंटर मियामी सीएफ (Inter Miami CF) यांच्यासोबत अनेक ऐतिहासिक विक्रम आणि ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत. आता सर्वांचे लक्ष एका प्रश्नाकडे लागले आहे, तो म्हणजे फुटबॉलचा हा महानायक २०३० विश्वचषकातही मैदानावर दिसणार का? याचे उत्तर आता येणारा काळच देईल. (Lionel Messi)




