कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळही वाद आणि नाट्यमय घडामोडींनी गाजला. पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात बाचाबाची झाली होती. या प्रकरणात आयसीसीने दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी एक डिमेरिट पॉइंट दिला होता आणि त्यांच्या सामन्याच्या मानधनातील २५ टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली होती. (India vs Sri Lanka 2nd Test)
अंपायरच्या निर्णयावर श्रीलंकन खेळाडू नाराज :
श्रीलंकेच्या डावातील दुसऱ्या ओव्हरपूर्वीच कमी प्रकाशाचा मुद्दा उपस्थित झाला. प्रभात जयसूर्या फलंदाजीसाठी स्ट्राइकवर येत असताना मैदानात अंधार वाढला होता. अंपायरनी लाईट मीटरने प्रकाशाची तीव्रता तपासली. त्यानंतर फक्त फिरकी गोलंदाजांना गोलंदाजी करण्याची परवानगी देण्यात आली, तर वेगवान गोलंदाजांना गोलंदाजी करता येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. यानंतर भारतीय कर्णधार शुभमन गिलने मानव सुथारच्या हातात चेंडू सोपवला. या निर्णयामुळे श्रीलंकन खेळाडूंमध्ये नाराजी पसरली. (India vs Sri Lanka 2nd Test)
कोलंबो : दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानावर झालेल्या झटापटीनंतर भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो ...
विकेट पडताच जयसूर्याचा संताप :
अंपायरच्या निर्णयावर प्रभात जयसूर्या आणि कामिल मिशारा यांनी मैदानावरच नाराजी व्यक्त केली. मात्र, खेळ सुरूच राहिला. दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर मानव सुथारने प्रभात जयसूर्याला एलबीडब्ल्यू बाद केलं. बाद झाल्यानंतरही जयसूर्याचा संताप कायम होता. त्याने अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत मैदान सोडलं. ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्यानंतर त्याने आपले ग्लोव्हज फेकल्याचंही पाहायला मिळालं. (India vs Sri Lanka 2nd Test)
टीम इंडिया मजबूत स्थितीत :
प्रभात जयसूर्याची विकेट पडताच अंपायरनी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. दिवसअखेर श्रीलंकेची अवस्था 8 धावांवर 2 बाद अशी झाली. प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (India vs Sri Lanka 2nd Test)
कोलंबो : भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आपले स्थान मजबूत केले आहे. देवदत्त पडिक्कलच्या शतकानंतर ध्रुव जुरेलच्या शतकामुळे भारताने नऊ गडी ...
भारताचा डाव ५०३ धावांवर घोषित :
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ५०३ धावांवर ९ विकेट गमावून डाव घोषित केला. ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांनी शानदार शतके झळकावली. कर्णधार शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी केली, तर रवींद्र जडेजाने ४३ धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारत सामन्यावर मजबूत पकड ठेवून आहे. (India vs Sri Lanka 2nd Test)




