विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; सुनेत्रा पवारांसह अक्षय कर्डिले यांनी घेतली आमदारकीची शपथ
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून मुंबईत सुरुवात झाली. या अधिवेशनात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि प्रसारमाध्यमकर्मींना प्रवेशासाठी 'डिजिटल फेस रेकॉग्निशन' (चेहरा पडताळणी) प्रणाली अनिवार्य करण्यात आली. पहिल्या दिवशी तांत्रिक गोंधळामुळे ओळखपत्र दाखवून अनेकांना प्रवेश देण्यात आले. मात्र, मंगळवारपासून (२३ जून) 'डिजिटल फेस रेकॉग्निशन' नसलेल्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याची घोषणा विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर, तर विधान परिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी केली.
NEET UG Re-Exam 2026 : वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'नीट यूजी' (NEET UG) फेरपरीक्षा रविवारी (दि. २१) जिल्ह्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शांततेत ...
राष्ट्रगीत, वंदे मातरम् आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने विधानसभा आणि विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. बारामतीमधील पोटनिवडणुकीद्वारे विधानसभेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अक्षय कर्डिले यांनी विधानसभेच्या सभागृहात सदस्यत्वाची व गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व प्रमुख मंत्री उपस्थित होते.
दुसरीकडे, विधानपरिषदेचे कामकाज सुरू होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात नव्याने प्रवेश केलेल्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा अधिकृत परिचय करून दिला. यामध्ये डॉ. नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, अंबादास दानवे, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे या नेत्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे सभागृहात स्वागत करत त्यांच्या पुढील संसदीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
फडणवीस सरकारचा नवा विक्रम; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २० हजार ७५२ कोटींची तरतूद मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि. २२) ...






