Legislative Council Election 2026 : विधानपरिषदेच्या ११ पैकी १० जागांवर महायुतीचा झेंडा

- नाशिकमध्ये उलटफेर; शिवसेनेला धक्का देत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी


मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषदेच्या ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने १० जागांवर एकतर्फी विजय मिळवत आपला वरचष्मा सिद्ध केला आहे. मात्र, या निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून अत्यंत धक्कादायक निकाल समोर आला आहे. वरिष्ठांच्या मनधरणीनंतर शिवसेना उमेदवाराविरोधातील तलवार म्यान करणाऱ्या अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा अनपेक्षित विजय झाला आहे. (Legislative Council Election 2026)


नाशिकच्या एका जागेचा अपवाद वगळता नागपूर, जळगाव, भंडारा-गोंदिया, नांदेड, सांगली-सातारा, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या सर्वच प्रमुख जागांवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. आधीच ६ जागा बिनविरोध खिशात टाकणाऱ्या महायुतीने आजच्या निकालांसह एकूण १७ पैकी १६ जागांवर कब्जा केला असला, तरी नाशिकमधील विजेते गोकुळ गीते हे मूळचे भाजप कार्यकर्ते असल्याने हाही विजय महायुतीचाच मानला जात आहे. (Legislative Council Election 2026)


आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर नाशिकमधील हायव्होल्टेज लढतीमुळे राजकारणातील सस्पेन्स कमालीचा वाढला होता. नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच प्रचंड राजकीय नाट्य पाहायला मिळाले होते. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि उदय सावंत यांनी गोकुळ गीते यांनी केलेल्या मनधरणीनंतर त्यांनी आपला अर्ज कायम ठेवत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी मोठा उलट फेर पहायला मिळाला. (Legislative Council Election 2026)



नाशिकमध्ये काय घडले?


- कोणताही जाहीर प्रचार न करता केवळ स्थानिक पातळीवरील अंतर्गत गणितांच्या बळावर अपक्ष गोकुळ गीते यांनी विजय मिळवला. नाशिकमध्ये एकूण ६१९ पैकी ६१८ मतदारांनी मतदान केले होते, ज्यातील १३ मते अवैध ठरल्याने विजयाचा कोटा ३०३ निश्चित करण्यात आला होता. या पहिल्याच पसंतीक्रमाच्या फेरीत गोकुळ गीते यांनी तब्बल ३५७ मते मिळवत महायुतीचे अधिकृत उमेदवार दराडे (२४८ मते) यांचा धुव्वा उडवला.


- या धक्कादायक निकालानंतर मतमोजणी केंद्रावर दराडे आणि गीते समर्थक आमने-सामने आल्याने काही काळ धक्काबुक्की आणि शिवीगाळीचा प्रकार घडला. विजयानंतर "अखेर सत्याचाच विजय होतो," अशी प्रतिक्रिया गोकुळ गीते यांनी दिली. (Legislative Council Election 2026)



जळगाव, नागपूर आणि सांगली-साताऱ्यात भाजपचे कमळ फुलले :


जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेत ५७७ मतांच्या मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. नागपूरच्या पोटनिवडणुकीत भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचा पराभव करत भाजपचा गड राखला. सांगली-सातारा मतदारसंघातही भाजपच्या धैर्यशील कदम यांनी ५९१ पहिल्या पसंतीची मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभयसिंह जगताप (२९५ मते) यांचा एकतर्फी पराभव केला; येथे विजयासाठी ४४३ मतांचा कोटा ठरवण्यात आला होता तर ९ मते अवैध ठरली. (Legislative Council Election 2026)



संभाजीनगर, नांदेड आणि धाराशिवमध्ये महायुतीची सरशी :


छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात भाजपचे सुहास शिरसाठ ४५४ मते मिळवून विजयी झाले, तर त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी उबाठा गटाचे गणेश लोखंडे यांना अवघी १३४ मते मिळवता आली. या मतमोजणीत एकूण ९ मते अवैध ठरली. नांदेडमध्ये महायुतीचे अमरनाथ राजूरकर यांनी ३३९ मते मिळवत विजय मिळवला; येथे मविआचे कृष्णा पाटील आष्टीकर यांना अवघी ८४, तर वंचितच्या प्रशांत इंगोले यांना फक्त ५ मते मिळाली. तसेच, धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघात महायुतीचे भाजप उमेदवार बसवराज पाटील यांनी ८४५ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला, या ठिकाणी १४ मते बाद झाली. (Legislative Council Election 2026)



भंडारा-गोंदियात काँग्रेस पराभूत :


भंडारा-गोंदिया मतदारसंघातून महायुतीचे आणि भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर ३०४ मते मिळवून मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर (१५२ मते) यांचा १४८ मतांनी पराभव केला. येथील ४५७ मतांपैकी केवळ १ मत अवैध ठरले. ब्राह्मणकर यांच्या विजयाची घोषणा होताच मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजर आणि गुलाल उधळत मोठा विजयोत्सव साजरा केला. (Legislative Council Election 2026)

Comments
Add Comment

Girish Mahajan On Gokul Gite Victory : गोकुळ गितेंच्या विजयाने महायुतीत खळबळ; ‘कोणी विश्वासघात केला, चौकशी होणार’ - गिरीश महाजन

Girish Mahajan On Gokul Gite Victory : नाशिक विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था (Nashik Vidhan Parishad Election) मतदारसंघाच्या निवडणुकीतील निकालानंतर

Maharashtra Monsoon Session 2026 : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत सादर झाला शोकप्रस्ताव

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून म्हणजेच सोमवार २२ जूनपासून सुरुवात झाली असून १०

Nashik Vidhan Parishad Election : विजय मिळताच गोकुळ गितेंना शिंदेंचा मेसेज ? मुंबईत आज मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता

Nashik Vidhan Parishad Election : नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या (Nashik Vidhan Parishad Election) निवडणुकीत अपक्ष

Dubai : कतारच्या गॅस टर्मिनलमध्ये भीषण स्फोट; ५४ जण जखमी, १८ बेपत्ता

कतार : कतारमधील (Qatar) रास लफान औद्योगिक क्षेत्रात रविवारी रात्री मोठा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या स्फोटानंतर

Nashik Vidhan Parishad Election Result 2026 Gokul Geete : नाशिकमधून गोकुळ गीते यांचा दणदणीत विजय

नाशिक: राज्यभराचे लक्ष लागलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा

Legislative Council Election 2026 : आज ११ जागांचा निकाल; ६ जागांवर उमेदवार आधीच बिनविरोध विजयी

मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल आज (सोमवारी) जाहीर