BMC Coastal Committee : मुंबईतील किनारपट्टींच्या संवर्धनासाठी स्वतंत्र कोस्टल कमिटी, महापालिका सभागृहात ठराव मंजूर

चौपाट्यांच्या अस्वच्छतेवरून नगरसेवकांनी तीव्र नाराजी


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या किनारप‌ट्टीचे संवर्धन, संरक्षण, व्यवस्थापन व शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिके अंतर्गत स्वतंत्र 'कोस्टल कमिटी' स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये कोळ्यांची व्याख्या सुस्पष्ट करण्यात यावी या उपसूचनेसह हा ठराव मंजहूर करण्यात आला. भाजप नगरसेविका योगिता कोळी यांनी मांडलेल्या ठरावाची सूचना महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आली. त्यामुळे सागरी जैवविविधतेचे संरक्षण, कोळीवाड्‌यांच्या मूलभूत सुविधांचा विकास व पुनर्विकास, जलक्रीडा व सागरी पर्यटनाला प्रोत्साहन, किनारी विकासाचे नियोजन तसेच किनारी भागांतील अतिक्रमण व पर्यावरणीय हानी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनाचे नियोजन, समन्वय व देखरेख करण्याची जबाबदारी देता येणे शक्य होणार आहे.



सागरी जैवविविधतेचे संरक्षण, कोळीवाड्‌यांच्या मूलभूत सुविधांचा विकास व पुनर्विकास, जलक्रीडा व सागरी पर्यटनाला प्रोत्साहन, किनारी विकासाचे नियोजन तसेच किनारी भागांतील अतिक्रमण व पर्यावरणीय हानी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनाचे नियोजन, समन्वय व देखरेख करण्याची जबाबदारी देता येणे शक्य होईल. यासाठी मुंबईच्या किनारप‌ट्टीचे संवर्धन, संरक्षण, व्यवस्थापन व शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत स्वतंत्र 'कोस्टल कमिटी' स्थापन करण्यात यावी अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे योगिता कोळी यांनी मांडला. यावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पाठिंबा देत ही समिती नेमताना कोळ्यांची व्याखा ठरवण्याची मागणी केली. तर अंकित प्रभू यांनी अनेक सागरी किनारा लाभलेल्या शहरांनी ज्या उपाययोजना राबवल्या आहेत, त्याचा विचारही केला जावा अशी मागणी केली. तर काँग्रेसचे विरेंद्र चौधरी यांनी जुहू चौपाटीचा परिसर स्वच्छ दिसत असला तरी बाकीच्या चौपाट्या या अस्वच्छ असून त्यावर मोठ्याप्रमाणात कचरा दिसून येत आहे. निवाटे यांनी जुहू चौपाटी स्वच्छ करताना खार दांडा परिसरात तेथील कचरा टाकला. त्यामुळे हा परिसर कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड बनले असल्याचे सांगितले. जर अफरोझ हा एकटा चौपाट्यांची स्वच्छता करू शकतो तर महापालिका का करू शकत नाही असा सवाल तुलिफ मिरांडा यांनी केला. तर गोराई चौपाटीची स्वच्छता होत नसून दीड किलोमीटरचा परिसर या स्वच्छतेच्या कामांमध्ये समावेश करण्याची मागणी शिवानंद शेट्टी यांनी केली. तर सभागृहनेेते गणेश खणकर यांनी चौपाटीची स्वच्छता राखण्याची ही जबाबदारी असतानाच तिवरांच्या ज्या जागा आहेत, त्यावर भराव होणार नाही याची काळजी कोण घेणार असा सवाल केला.यावेळी झालेल्या चर्चेत हेमांगी वरळीकर, स्वप्ना म्हात्रे, संगीता कोळी आदींनी भाग घेतला होता. त्यामुळे उपसूचनेसह ठरावाची मूळ सूचना मंजूर करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Vishakha Raut : माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद धोक्यात जात प्रमाणपत्र ठरवले आहेत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : माहीम येथील प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आलेल्या उबाटाच्या नगरसेविका माजी महापौर

Private Coaching Center : खासगी शिकवणी केंद्रांच्या नियमनासाठी कायद्याच्या प्रारूप मसुद्यावर ४ सप्टेंबरपर्यंत सूचना-हरकती पाठविण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी व नियमनासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दृष्टीने शासनाने

Mega Block : रविवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; लोकल सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी येत्या रविवारी, दिनांक