Legislative Council Election 2026 : आज ११ जागांचा निकाल; ६ जागांवर उमेदवार आधीच बिनविरोध विजयी

मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल आज (सोमवारी) जाहीर होणार असून उर्वरित ११ जागांवरील उमेदवारांचे भवितव्य मतमोजणीत ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना, नाशिक, सांगली-सातारा यांसह विविध मतदारसंघांच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Legislative Council Election 2026)


'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना या निवडणुकीसाठी सरासरी ९९.०२ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. राज्यातील एकूण १७ जागांपैकी ६ जागांवर महायुतीचे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित ११ जागांसाठी गुरुवारी मतदान पार पडले होते. (Legislative Council Election 2026)


मतमोजणी सोमवारी सकाळपासून सुरू होत असून दुपारपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विशेषतः नाशिक आणि सांगली-सातारा मतदारसंघातील निकालांकडे महायुतीतील अंतर्गत राजकीय समीकरणांमुळे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Legislative Council Election 2026)



६ उमेदवार बिनविरोध विजयी :


महायुतीने निवडणुकीपूर्वीच ६ जागा बिनविरोध जिंकत आघाडी घेतली आहे. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये:


अरुण लखाणी (भाजप) – वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर
विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – पुणे
रवींद्र फाटक (शिवसेना) – ठाणे
अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) – रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना) – यवतमाळ
प्राजक्त तनपुरे (भाजप) – अहिल्यानगर (Legislative Council Election 2026) यांचा समावेश आहे.



विजयाचा कोटा कसा ठरतो?


विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी वैध मतांच्या ५० टक्के अधिक १ मतांचा कोटा निश्चित केला जातो. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणत्याही उमेदवाराला आवश्यक कोटा मिळाला नाही, तर दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते. नाशिक मतदारसंघात ६१९ पैकी ६१८ मतदारांनी मतदान केले आहे. सर्व मते वैध ठरल्यास विजयासाठी ३१० मतांचा कोटा आवश्यक राहणार आहे. (Legislative Council Election 2026)



कुठे किती मतदान?


या निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघाने १०० टक्के मतदानाची नोंद केली, तर अमरावतीत सर्वात कमी ९४.६८ टक्के मतदान झाले.



मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:


भंडारा-गोंदिया – १००%
सांगली-सातारा – ९९.८९%
नाशिक – ९९.८४%
परभणी-हिंगोली – ९९.७९%
नांदेड – ९९.७८%
सोलापूर – ९९.६८%
धाराशिव-लातूर-बीड – ९९.४९%
छत्रपती संभाजीनगर-जालना – ९८.९०%
नागपूर – ९८.४४%
जळगाव – ९७.७८%
अमरावती – ९४.६८%



निकालाकडे सर्वांचे लक्ष :


महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. विशेषतः नाशिक, सांगली-सातारा आणि छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघांतील निकाल आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणारे ठरू शकतात. त्यामुळे आजच्या मतमोजणीकडे राज्यातील राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. (Legislative Council Election 2026)


Comments
Add Comment

Maharashtra FDA : FDAची मोठी कारवाई! मुंबईतील 7 ठिकाणांचे परवाने निलंबित; गुटखा प्रकरणात 6 जणांना अटक

मुंबई : महाराष्ट्रात अन्न सुरक्षेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. 19 आणि 20 ऑगस्ट रोजी राबवण्यात

Maharashtra Weather Alert : श्रावणसरी गायब! महाराष्ट्रावर पावसाचे संकट; पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक

Neeraj Chopra : लुसाने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा सीझनमधील सर्वोत्तम थ्रो; अवघ्या ९ सेंटीमीटरने हुकलं सुवर्णपदक

नवी मुंबई : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने लुसाने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League)

Vishakha Raut News : विशाखा राऊतांचे जात प्रमाणपत्र रद्द; सदा सरवणकर, प्रिया सरवणकरांची एकनाथ शिंदेंशी भेट

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे

BMC Coastal Committee : मुंबईतील किनारपट्टींच्या संवर्धनासाठी स्वतंत्र कोस्टल कमिटी, महापालिका सभागृहात ठराव मंजूर

चौपाट्यांच्या अस्वच्छतेवरून नगरसेवकांनी तीव्र नाराजी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या किनारप‌ट्टीचे

Milk adulteration in Navi Mumbai : नवी मुंबईतील महापेतून लाखो रुपयांचा भेसळ केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त

महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने