मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. पक्षाचे खासदार आणि प्रमुख नेते संजय राऊत यांना कार्यक्रमात भाषणाची संधी न मिळाल्याने भाजपने त्यावरून जोरदार टीका केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. (Navnath Ban On Sanjay Raut)
नवनाथ बन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "उबाठा गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात नेहमीप्रमाणे भोंगा वाजलाच नाही. रोज इतरांवर टीका करणारे आणि आक्रमक भूमिका घेणारे संजय राऊत भाषणासाठी पूर्ण तयारीत होते, मात्र त्यांना मंचावर बोलण्याची संधीच देण्यात आली नाही." (Navnath Ban On Sanjay Raut)
मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी बेस्ट बससेवा दुसऱ्या दिवशीही ठप्प राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट ...
'राऊतांची पक्षातील किंमत कमी झाली?'
भाजपने या घटनेचा दाखला देत राऊत यांचे पक्षातील महत्त्व कमी झाल्याचा दावा केला आहे. "ज्यांच्या पत्रकार परिषदेशिवाय दिवस उजाडत नाही, अशा संजय राऊत यांना स्वतःच्या पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात बाजूला बसवावे लागले, यावरून पक्षातील त्यांची घटती ताकद स्पष्ट होते," असा टोला नवनाथ बन यांनी लगावला. (Navnath Ban On Sanjay Raut)
आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत?
भाजपच्या दाव्यानुसार, वर्धापन दिनाच्या मंचावर आदित्य ठाकरे यांचे वर्चस्व दिसून आले. "कालपर्यंत पक्षाचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असल्याचा आभास निर्माण करणाऱ्या संजय राऊत यांचाच रिमोट आता काढून घेण्यात आला आहे. रोज इतरांवर भोंगा वाजवणाऱ्या राऊतांचा भोंगा यावेळी मंचावरच म्यूट करण्यात आला," अशी उपरोधिक टीकाही बन यांनी केली. (Navnath Ban On Sanjay Raut)
मुंबई : भायखळा पश्चिम येथील दगडी चाळ परिसरात शुक्रवारी रात्री धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतीच्या पाडकामादरम्यान भिंतीचा काही भाग अचानक ...
राजकीय चर्चांना उधाण :
संजय राऊत यांना भाषणाची संधी न मिळाल्याने पक्षात अंतर्गत मतभेद आहेत का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. मात्र उबाठा गटाकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. कार्यक्रमाचे वेळापत्रक आणि मर्यादित वक्त्यांमुळे काही नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली नसल्याची शक्यताही राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. (Navnath Ban On Sanjay Raut)
दरम्यान, भाजपने या मुद्द्यावरून उबाठा गटाला लक्ष्य करत "आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत" असा नवा राजकीय सामना सुरू झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आगामी काळात या विषयावर उबाठा गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Navnath Ban On Sanjay Raut)
उबाठा गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात भोंगा वाजलाच नाही! जनाब संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे शिवीगाळ आणि वल्गनांची पूर्ण तयारी करून ठेवली होती. मात्र आदित्य ठाकरे यांनीच त्यांचा डाव उधळून लावत राऊत यांना भाषणाची संधी दिली नाही. ज्यांच्या भाषणाशिवाय दिवस उजाडत नाही, त्या संजय राऊत… pic.twitter.com/gf3Sru6kka
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) June 20, 2026




