वेळीच ओळखा ही लक्षणे
अलीकडच्या काळात हृदयविकाराचा झटका केवळ ज्येष्ठांपुरता मर्यादित राहिलेला नाही. बदलती जीवनशैली, ताणतणाव, अपुरी झोप, संतुलित आहार वेळेत न घेणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुणांमध्येही हृदयाशी संबंधित समस्या वाढताना दिसत आहेत. विशेषतः "सायलेंट हार्ट अटॅक" (Silent Heart Attack) हा प्रकार चिंतेचा विषय ठरत आहे.
अन्यथा सबसिडी मिळण्यात अडचण ...
सामान्य हार्ट अटॅकमध्ये छातीत तीव्र वेदना जाणवतात. मात्र सायलेंट हार्ट अटॅकमध्ये लक्षणे अतिशय सौम्य किंवा अस्पष्ट असू शकतात. त्यामुळे अनेकांना हार्ट अटॅक आल्याचेही कळत नाही. हीच बाब अधिक धोकादायक ठरते.
तज्ज्ञांच्या मते, सतत थकवा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक घाम येणे, चक्कर येणे किंवा छातीत हलकी अस्वस्थता जाणवणे ही सायलेंट हार्ट अटॅकची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. काही वेळा जबडा, मान, पाठ किंवा खांद्यात वेदना जाणवू शकतात. अनेकजण ही लक्षणे सामान्य थकवा किंवा गॅसची समस्या समजून दुर्लक्ष करतात.
मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान आणि कौटुंबिक हृदयविकाराचा इतिहास असलेल्या व्यक्तींमध्ये धोका अधिक असतो. तसेच सतत तणावाखाली राहणाऱ्या आणि शारीरिक हालचाल कमी असलेल्या तरुणांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
कॅनडा : मंगळवार, १६ जून रोजी, कॅनडातील टोरोंटो स्टेडियमवर नेदरलँड्स आणि कॅनडा यांच्यात एकदिवसीय सामना खेळला गेला. नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम ...
आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी शरीर देत असलेल्या छोट्या संकेतांकडे लक्ष द्या. वेळेत निदान आणि योग्य उपचार केल्यास गंभीर धोका टाळता येऊ शकतो.






