मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये बेबी बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारत अ संघात संधी देण्यात आली होती. मात्र या संधीचे सोने करण्यात वैभव अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत वैभव अपेक्षाप्रमाणे कामगिरी करू शकला नाही आणि मागील सामन्यात आउट झाल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंसोबत त्याचा वादही झाला.यामुळे सोशल मीडियावर वैभवच्या बाबतीत चर्चा सुरू झाल्या आहेत.
तिरंगी मालिकेत वैभवची कामगिरी
आयपीएलमधील अविस्मरणीय कामगिरीमुळे बीसीसीआयने वैभवला १५ व्या वर्षीच भारत अ संघात संधी दिली. तिरंगा मालिकेत भारत अ संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यांत वैभवला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलेले नाही. त्याच्या या खराब फॉर्मचे मुख्य कारण फॉरमॅट बदलणे असल्याचे सांगितले जात आहे. वैभव सूर्यवंशीने टी-२० क्रिकेटमध्ये आक्रमक आणि प्रभावी फलंदाजी केली आहे.मात्र, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची बॅट अपेक्षेप्रमाणे चाललेली नाही. विशेष म्हणजे, अंडर १९ स्तरावर या प्रकारात त्याने चांगली कामगिरी केली होती,परंतु वरिष्ठ स्तरावरील क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यापासून त्याला सातत्य राखण्यात अपयश आले आहे.
मुंबई: भारतीय हॉकी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी भारतीय महिला हॉकी संघाने मंगळवार, १६ जून रोजी ऑकलंडमधील नॉर्थ हार्बर नॅशनल हॉकी सेंटर येथे झालेल्या पूल ...
पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध वैभव अवघ्या सहा धावांवर बाद झाला. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने थोडी फटकेबाजी केली,परंतु या सामन्यातही तो मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध २२ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात वैभवने संयमी सुरुवात केली. त्याने १२ चेंडूंमध्ये १४ धावा केल्या. (sports)
आयपीएलमध्ये वैभवची कामगिरी
वैभव सूर्यवंशीने गेल्या हंगामात १९ एप्रिल २०२५ ला लखनऊ विरुद्ध आयपीएल पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १७ सामने खेळले आहेत.आयपीएलच्या १७ सामन्यात त्याने ६५६ धावा केल्या आहेत यात २ शतकं आणि तीन अर्धशतकांचाही समावेश आहे.वैभवने आयपीएलच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार मारले आहेत. याआधी हा विक्रम मुरली विजयच्या नावावर होता. त्याने आयपीएलच्या अवघ्या १५ डावात ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. तो आयपीएल इतिहासात सर्वात जलद ५०० धावा करणारा फलंदाज आहे.आयपीएल इतिहासात सर्वात जलद शतक मारणाऱ्या खेळाडूंमध्ये वैभवचा समावेश आहे. त्याने आयपीएल २०२६ मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. त्याच्या पुढे फक्त ख्रिस गेल आहे.आयपीएल २०२६ मध्ये वैभवने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १६ सामन्यात ७७६ धावा केल्या आणि या हंगामात सर्वाधिक षटकारही मारले आहेत.
मुंबई: कोकणातील जागतिक महत्त्वाच्या कातळशिल्पांच्या वैज्ञानिक अभ्यास, डिजिटल दस्तऐवजीकरण आणि संवर्धनासाठी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये ...
वैभव का ठरतोय मागे ?





