कोलकाता: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि लोकप्रिय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्याबाबत सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक आणि खोटी बातमी पसरवण्यात आली होती. गांगुली यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापा टाकल्याचा दावा या बातमीत करण्यात आला होता. या अफवेने क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र, ही बातमी पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आल्यानंतर सौरव गांगुली यांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेत कायदेशीर कारवाईचा मार्ग निवडला आहे.
कॅलिफोर्निया: फिफा वर्ल्ड कप 2026 ग्रुप- G च्या सामन्यात इराण आणि न्युझीलंडमध्ये जोरदार चुरस पहायला मिळाली. दोनदा मागे पडल्यानंतर इराणने जिद्दीने ...
काय आहे संपूर्ण प्रकरण?
'सौरव गांगुली फॅन' (Sourav Ganguly Fan) नावाच्या एका फेसबुक पेजवर आणि 'स्पोर्ट्सविकी' (SportsWiki) नावाच्या वेबसाईटवर सौरव गांगुली यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्याची चुकीची माहिती प्रसारित करण्यात आली होती. संबंधित फेसबुक पेजला ३६ लाखांहून अधिक फॉलोअर्स असल्याने ही खोटी बातमी अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. यामुळे सौरव गांगुली यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला.
फ्लोरिडा : फिफा वर्ल्ड कप 2026 ग्रुप-H मध्ये सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यात महत्त्वाचा सामना झाला. या सामन्यात कोणत्याही संघाला विजय मिळवता आला नाही. ...
सौरव गांगुली यांची पोलिसांत धाव
या प्रकाराची गंभीर दखल घेत सौरव गांगुली यांनी १५ जून रोजी कोलकाता येथील ठाकूरपुकुर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. आपली प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने ही खोटी बातमी पसरवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना गांगुली म्हणाले, "सार्वजनिक जीवनात असताना टीका होणे ही सामान्य बाब आहे आणि आम्ही ती सहन करण्यास तयार असतो. मात्र, अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवून जाणीवपूर्वक बदनामी करणे पूर्णपणे चुकीचे आहे. हे माझी प्रतिमा खराब करण्यासाठी केले गेले असून, म्हणूनच मी कायदेशीर पाऊल उचलले आहे."
फिफा विश्वचषक २०२६ मधील गट ‘जी’च्या सामन्यात बेल्जियम आणि इजिप्त यांच्यात १-१ अशी रंगतदार बरोबरी झाली. मात्र या निकालामुळे इजिप्तचा स्टार फुटबॉलपटू ...
पोलिसांची कारवाई सुरू
सौरव गांगुली यांनी पोलिसांकडे या अफवा पसरवणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली असून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, संबंधित फेसबुक पेज आणि वेबसाईटने ही माहिती नेमकी कुठून मिळवली आणि ती पसरवण्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेत आहेत.



