Kalpana Kharat : अशोक खरातच्या पत्नीला मोठा झटका !थेट... न्यायालयाचे गंभीर निरीक्षण

Kalpana Kharat : शिर्डीतील गाजत असलेल्या फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. मुख्य आरोपी अशोक खरात (Ashok Kharat) याची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) हिला मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाकडून मोठा धक्का बसला आहे. अटकेपासून दिलासा मिळावा म्हणून दाखल करण्यात आलेला तिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता तिच्या पोलीस कोठडीतील चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे.



नेमकं प्रकरण काय ?


फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्याने आरोपींकडून तब्बल 3 कोटी रुपये मासिक 2 टक्के व्याजाने कर्ज घेतले होते. या व्यवहाराच्या हमीपोटी फिर्यादीच्या शेतीचे खरेदीखत कल्पना खरातच्या नावावर करण्यात आले होते. फिर्यादीने संपूर्ण कर्ज आणि व्याजाची रक्कम परत केल्यानंतरही जमीन परत देण्यास आरोपींकडून नकार देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडिताने शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) धाव घेत तक्रार दाखल केली.



खरेदीखतावर कल्पना खरातच्या स्वाक्षऱ्या


दरम्यान, कल्पना खरातने (Kalpana Kharat) न्यायालयात दावा केला की, या आर्थिक व्यवहारात तिचा कोणताही सहभाग नसून केवळ मुख्य आरोपीची पत्नी असल्याने तिला गोवण्यात आले आहे. मात्र, सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांमुळे हा दावा कमकुवत ठरला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या जमिनीच्या खरेदीखतावर कल्पना खरातच्या स्वाक्षऱ्या आढळल्या. याशिवाय, तिच्या बँक खात्यातील व्यवहारांमधूनही या प्रकरणाची माहिती आणि सहभाग असल्याचे प्राथमिक पुरावे समोर आल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.



न्यायालयाचे गंभीर निरीक्षण


दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कठोर निरीक्षण नोंदवत, खरातच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कल्पना खरातच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नोंदवले की, "अर्जदार महिलेने आपल्याला या व्यवहाराची माहिती नसल्याचा केलेला दावा प्रथमदर्शनी पूर्णपणे खोटा असल्याचे दिसून येत आहे. तिने स्वतःचा गुन्ह्याशी संबंध लपवण्यासाठी आणि न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी अनेक महत्त्वाची तथ्ये जाणीवपूर्वक दडपली आहेत".


खरेदीखतावरील स्वाक्षऱ्या आणि बँक खात्यातील व्यवहार हे कल्पना खरातचा गुन्ह्यातील प्राथमिक संबंध दर्शवण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे या गंभीर गुन्ह्याची सखोल पाळेमुळे खणून काढण्यासाठी आरोपीची कोठडीतील चौकशी आवश्यक आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाने कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Comments
Add Comment

Maratha Reservation : मराठा समाजासाठी महायुती सरकारएवढे निर्णय कोणीही घेतले नाहीत!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कुणाला न्याय मिळत नसल्याची भावना असेल, तर संवादातून मार्ग काढू मुंबई : "मराठा

Nitesh Rane : सागरमाला २.० अंतर्गत महाराष्ट्रातील प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा

राज्यातील बंदर विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्राधान्याने मंजुरीची मागणी केंद्रीय बंदरे,

Minister Babasaheb Patil : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार

पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करावे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे

ADR Report : १४ मुख्यमंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद; डी. के. शिवकुमार सर्वात श्रीमंत, तर भजनलाल यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती

नवी दिल्ली  : 'एसोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (ADR) ने देशातील ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या

Prasad Oak : चित्रपती व्ही. शांताराम व राज कपूर जीवनगौरव तसेच विशेष योगदान पुरस्कार जाहीर

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे २०२५ चे 'चित्रपती व्ही. शांताराम

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल, आतापर्यंत १३ आरोपींना अटक

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात एक मोठे पाऊल उचलले असून, राऊस ॲव्हेन्यू