Nashik Crime : सुटकेसमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; शहरात खळबळ

Nashik Crime News : नाशिक शहरात एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील तपोवन परिसरात एका सुटकेसमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. एकीकडे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर तपोवन (Tapovan) परिसरात विकासकामांची जोरदार रेलचेल सुरू असतानाच दुसरीकडे आज ही धक्कादायक घटना घडली आहे.



सुटकेसमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह


केवडी बन परिसरात (Kevadi Ban Area) असलेल्या कृषी गो सेवा ट्रस्ट गोशाळेजवळ एका सुटकेसमध्ये आणि गोणीत अत्यंत क्रूरपणे भरून ठेवलेला दुर्गंधीयुक्त मृतदेह (Dead Body) आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.


परिसरात काम करणाऱ्या ग्लोबल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तीव्र दुर्गंधी येऊ लागली. संशय आल्याने कर्मचाऱ्यांनी शोध घेतला. यावेळी त्यांना एक संशयास्पद सुटकेस आणि गोणी आढळून आली. कर्मचाऱ्यांनी हिम्मत करून ती उघडून पाहिली तर त्यात मृतदेह असल्याचे समोर आले. आणि एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.



हत्या करून मृतदेह फेकला ?


मृतदेह सुटकेसमध्ये गोणीत भरून फेकण्यात आल्याने ही स्पष्टपणे हत्येची घटना असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झाली असून त्यातून तीव्र दुर्गंधी सुटली आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी (Panchavati police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता सदर मृतदेह महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या अनुषंगाने तपासाची चक्रे फिरवली. याशिवाय घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.



ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान


मृत्यू कधी झाला आणि कसा झाला हे शोधण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील आणि जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. सिंहस्थाच्या कामांमुळे सध्या तपोवन परिसरात मजुरांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते, अशा गजबजलेल्या भागात सुटकेसमध्ये गोणीत भरलेला मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सध्या सर्व बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

West Bengal : पश्चिम बंगालचे माजी उपाध्यक्ष आशिष बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात उचलले टोकाचे पाऊल

रामपूरहाट : पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) ज्येष्ठ नेते आशिष बॅनर्जी

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या