Jalgaon Crime : वहिनीवर अत्याचाराचा प्रयत्न, विरोध केल्याने वहिनीची हत्या

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली होती. नियत फिरलेल्या दिराने वहिनीवरच अत्याचाराचा प्रयत्न केला, वहिनीने विरोध केल्याने संतापलेल्या दिराने तिचा गळा आवळून खून केला. ३ जुलै २०१८ रोजी ही घटना घडली होती. दरम्यान याप्रकरणी दीर प्रवीण छगन बैरागी (२६, रा. कुंझर, ता. चाळीसगाव) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मृत विवाहितेची सासू लीलाबाई बैरागी (Leelabai Bairagi) हिला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Jalgaon Crime News)



'त्यादिवशी' नेमकं काय घडलं ?


मृत महिलेचे पती हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात नोकरीस असल्याने ती आपल्या मुलीसह गावातील घरी सासू आणि दीरासोबत राहत होती. ३ जुलै २०१८ रोजी रात्री महिला आपल्या मुलीसह झोपली असताना तिचा दीर प्रवीण बैरागी (Praveen Bairagi) याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला तीव्र विरोध केला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवीणने तिचा जागीच गळा आवळून खून केला असे पोलीस तपासातून समोर आले. विवाहितेच्या खून प्रकरणात तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. (Jalgaon Crime News)



दीर आणि सासू दोघांनाही शिक्षा


खटल्याच्या सुनावणीदरम्यान मृत महिलेच्या मुलीसह तपासाधिकारी दिलीप शिरसाठ, जयपाल हिरे आणि हेमंत शिंदे यांच्या साक्षी या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरल्यात. साक्षीदारांचे जबाब आणि तपासातून समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी प्रवीण बैरागी याला दोषी ठरविले. या प्रकरणात पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मृत विवाहितेची सासू लीलाबाई बैरागी हिलाही न्यायालयाने दोषी ठरविले. तिला तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. (Jalgaon Crime News)


न्यायालयाने प्रवीण बैरागीला खुनाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेप (Life imprisonment) आणि २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास चार महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास, तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी एकत्रित शिक्षा सुनावण्यात आली.

Comments
Add Comment

Deepali Chavan Suicide : दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; 5.5 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पाहा काय आहे निकाल...

 Deepali Chavan Suicide : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या मृत्यू

Baramati News : 'जरा बारामतीकडे लक्ष द्या, दादा जाताच...' पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र व्हायरल

बारामती : बारामतीतील विविध समस्या आणि वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर एक कथित खुलं पत्र

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला तरी 'या' ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्यात अपेक्षित असलेला पाऊस अद्याप राज्यात म्हणावा तसा झालेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून

Jyotiba Shravan Shashti Yatra 2026 : श्री ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रेला २ लाख भाविकांची उपस्थिती

कोल्हापूर : वाडी रत्नागिरी म्हणजे जोतिबा डोंगर येथील श्री ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रेला यंदा भाविकांचा

Maharashtra Anti-Conversion Act : 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य' कायद्याची रक्षाबंधनापासून अंमलबजावणी

- महायुती सरकारची लाडक्या बहिणींना विशेष भेट; १० वर्षांपर्यंत कारावास, ७ लाखांचा दंड, धर्मांतराच्या उद्देशाने

Beed Crime : सीझर झालं, गोंडस बाळाचा जन्मही झाला पण... आईच्या पोटात अशी काही वस्तू राहिली की सगळ्यांनाच धक्का बसला

Beed : बीड जिल्हा रुग्णालयात घडलेला एक प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय