बांगुई: मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकामध्ये सोन्याची खाण कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. देशाच्या पश्चिम भागातील नाना-माम्बेरे प्रांतातील अब्बा परिसरात ही घटना घडली. खाणीत काम सुरू असताना अचानक खाणीचा काही भाग कोसळला. त्यावेळी आत अनेक कामगार उपस्थित होते. या दुर्घटनेत आतापर्यंत 30 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Gold Mine Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, खाण कोसळल्यानंतर स्थानिक कामगार आणि नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखालून 30 मृतदेह बाहेर काढण्यात आले. काही जखमी कामगारांनाही बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, अजूनही काही कामगार खाणीत अडकले असण्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Central African Republic)
Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली होती. नियत फिरलेल्या दिराने वहिनीवरच अत्याचाराचा प्रयत्न केला, वहिनीने विरोध केल्याने संतापलेल्या ...
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेनंतर बचाव पथकांकडून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळावरील परिस्थिती अत्यंत गंभीर असून, अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. (Mining Accident)
मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकमध्ये छोट्या आणि पारंपरिक पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या खाणींची संख्या मोठी आहे. या ठिकाणी हजारो कामगार सोने आणि इतर खनिजांच्या उत्खननाचे काम करतात. मात्र, अनेक खाणींमध्ये पुरेशा सुरक्षा उपायांचा अभाव असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे समोर आले आहे.
या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून बचावकार्याला वेग देण्यात आला आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांप्रति सरकारी अधिकाऱ्यांनी संवेदना व्यक्त केल्या असून, दुर्घटनेतील बाधितांना आवश्यक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. (Central African)