Kolkata Hotel Fire : कोलकात्यात बहुमजली हॉटेलला भीषण आग; ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी अंत, ६ गंभीर जखमी

कोलकाता :  कोलकात्यातून (Kolkata) एक अत्यंत दुर्दैवी आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास येथील एका गजबजलेल्या परिसरातील हॉटेलला अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत एका लहान मुलासह ९ बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.



वैद्यकीय उपचारासाठी आले होते भारतात


अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेले सर्व नागरिक हे बांगलादेशातून भारतात वैद्यकीय उपचारासाठी आले होते. यामध्ये ६ पुरुष, २ महिला आणि एका चिमुकल्याचा समावेश आहे. उपचार घेऊन परतण्यापूर्वीच त्यांच्यावर हा काळाने घाला घातला.



धुराच्या लोटामुळे ६० जणांची गुदमर


पहाटे २ वाजताच्या सुमारास हॉटेलमध्ये अचानक आग पसरली. काही वेळातच संपूर्ण इमारतीत धुराचे प्रचंड लोट पसरले, ज्यामुळे अनेक नागरिक आतच अडकले आणि गुदमरून बेशुद्ध पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकाने कौशल्याने तत्परता दाखवत सुमारे ६० हून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



सुरक्षा नियमांची पायमल्ली; दोन कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात


ही आग एका जुन्या आणि अत्यंत अरुंद गल्लीतील इमारतीमध्ये चालवल्या जाणाऱ्या हॉटेलमध्ये लागली. घटनास्थळी भेट दिल्यानंतर राज्याचे अग्निशमन मंत्री कौशिक चौधरी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. "इमारतीमध्ये सुरक्षेच्या कोणत्याही नियमांचे पालन केले जात नव्हते. एकाच इमारतीत अनेक हॉटेल्स बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे," असे मंत्री म्हणाले. या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत हॉटेलच्या दोन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.



शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना घडल्याचा संशय


आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नसले तरीही, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री सुवेंद्रू अधिकारी घटनेची पाहणी करण्यासाठी अपघातस्थळाला भेट देण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Moon Impact : चंद्रावर रॉकेट आदळल्याने ६० फूटांचा खड्डा; NASA च्या HD फोटोंमध्ये दिसला धडकेचा थरारक ठसा

नवी दिल्ली : चंद्राच्या पृष्ठभागावर झालेल्या एका मोठ्या रॉकेट धडकेचे स्पष्ट पुरावे आता समोर आले आहेत. अमेरिकेची

Satyendra Jain : 'आप'ला मोठा धक्का! माजी मंत्री सत्येंद्र जैन ६६९ दिवसांनी पुन्हा अटकेत; दिल्ली जल बोर्ड टेंडर घोटाळ्याप्रकरणी पुन्हा अटक

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (AAP) ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांना पुन्हा एकदा अटक

YouTube New Update : YouTube क्रिएटर्ससाठी सर्वात मोठी खूशखबर! आता व्हिडिओ सुरू होताच वाढणार...24 ऑगस्टपासून बदलणार नियम!

यूट्यूबवर व्हिडिओ (YouTube Video) तयार करणाऱ्या जगभरातील आणि राज्यातील लाखो क्रिएटर्ससाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली

NTA : नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा मोठा निर्णय, परीक्षा नियोजनातील पारदर्शकतेसाठी ६०० तज्ज्ञांना हटवले

नवी दिल्ली : परीक्षा नियोजनातील पारदर्शकतेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने ६०० तज्ज्ञांना हटवण्याचा

ChatGPT : किशोरांसाठी आलं अधिक सुरक्षित चॅट जीपीटी

मुंबई : १३ ते १७ वर्षे वयोगटातील किशोरांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करता यावा, यासाठी

Aadhaar Biometric Update : देशातील दोन कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अपडेट पूर्ण

नवी दिल्ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) तर्फे देशभरात युद्ध पातळीवर राबवण्यात येत असलेल्या