Nashik : रिक्षातून ९ लाखांचे दागिने चोरी, रिक्षाचालक ताब्यात

चाळीसगाव : रिक्षातून प्रवास करतांना नाशिक येथील महिला प्रवाशाकडील बॅगेतील सुमारे 9 लाख 37 हजार 500 रूपये किंमतीचे दागिने चोरी झाले होते. या प्रकरणात चाळीसगाव येथील टाकळी प्र.चा. भागातील रिक्षा चालकाचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. अंबड पोलिसांनी या घटनेची माहीती दिल्यानंतर चाळीसगाव शहर पोलिसांनी शिताफीने तपास करून चाळीसगावच्या रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन अंबड पोलीसांच्या ताब्यात दिले.



नेमकी घटना काय ?


नलिनी धनाजी गोसावी रा.कालीकानगर, उंटवाडी, सिडको,नाशिक ह्या 25 मे 2026 रोजी आई व भावासह माहेरी कुरूकवाडी ता.शिंदखेडा येथे गेेेलेले होत्या. तेथून त्या 6 जून रोजी धुळे ते निमाणी बसने नाशिक येथे परत आल्या. निमाणी ते घरपर्यंत त्यांनी रिक्षा केली. रिक्षात त्यांचे भाऊ पुढे तर नलिनी गोसवी व त्यांच्या आई मागच्या सिटवर बसले.त्यांच्यासह आणखी दोन अनोळखी इसम मागे बसले. नलिनी गोसावी यांच्याजवळ सोन्याची दागिणे असलेली बॅग होती ती त्यांनी रिक्षात मागे ठेवली होती. रिक्षा चालकाने सिव्हील हॉस्पीटल जवळ गॅस संपल्याचे सांगत रिक्षातून उतरवत दुसर्‍या रिक्षात बसवले.रात्री 11.45 वाजेच्या सुमारास त्या घरी गेल्यावर त्यांनी बॅग उघडून पाहीले असता बॅगेत ठेवलेले सोन्याच्या दोन पोत, सोन्याचा नेकलेस व चांदीचें मनगटे असा सुमारे 9 लाख 37 हजार 500 रूपये किंमतीचे दागिने हायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.



नलिनी गोसावी यांनी दागिण्यांबाबत नातेवाईकांकडे विचारणा केली परंतू दागिणे मिळून आले नाही. त्यामुळे कुरूकवाडी ते घरापर्यंत रिक्षा तसेच बसमध्ये कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवून हे दागिणे काढून घेतल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात दागिणे चोरीची फिर्याद दिली.


अंबड पोलीसांनी या गुन्ह्याच्या तपासात रवि घुमटकर रमेश जाधव व चाळीसगाव येथील रिक्षाचालक लखन सुकलाल पवार (32) रा. टाकळी प्र.चा.खरजई रेल्वे गेटजवळ यांचा सहभाग असल्याचे समोर आले. यात घुमतकर व जाधव यांना अंबड पोलीसांनी यापूर्वीच अटक केली असून त्यंाच्याकडून चोरी गेलेले दागिनेही हस्तगत केले आहे तर रिक्षाचालक लखल हा फरार होता.



अंबड पोलीसांनी ही माहिती चाळीसगाव शहर पोलीसांना दिल्यावर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राहूल सोनवणे यांनी आरोपीचा मागोवा घेतला. उपनिरीक्षक सुभाष पाटील, एएसआय अजय मालचे, हवालदार राहूल सोनवणे, अंमलदार दत्तू साळवे, सुनील पाटील, अशोक पाटील, जितेंद्र वाघ यांच्या पथकाने शोध मोहीम राबवून रिक्षाचालक लखन पवार यास ताब्यात घेतले. पवार यास अंबड पोलीसांकडे सुुपुर्द करण्यात आले.

Comments
Add Comment

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Antara Banerjee : अभिनेत्री अंतरा बॅनर्जीला अटक; ट्रेनमध्ये आरपीएफ जवानांवर केला रेझरने हल्ला

मुंबई : मॉडेल आणि वेब सिरीज अभिनेत्री अंतरा बॅनर्जी (३१) हिला १२ ऑगस्ट रोजी अरवली एक्सप्रेसमध्ये जागेचे आरक्षण

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा