Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष गाड्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. दादर-बलिया एक्स्प्रेस 17 ऑगस्टपासून, तर दादर-गोरखपूर एक्स्प्रेस 18 ऑगस्टपासून नियमित धावणार आहे. मात्र, महाराष्ट्रातील प्रवाशांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित दादर-रत्नागिरी, मुंबई-भुसावळ आणि सह्याद्री एक्स्प्रेससारख्या बंद गाड्या पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. (Central Railway)



राज्यातील बंद रेल्वेगाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी कोकण विकास समितीकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मार्च 2023 मध्ये तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संबंधित मागण्यांची तपासणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार रवींद्र वायकर यांनीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानंतर व्यवहार्यता तपासणीचे आदेश देण्यात आले. मात्र, त्यानंतरही ठोस निर्णय झालेला नसल्याची नाराजी कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान, दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया विशेष गाड्यांचे नियमित एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. 01025/01026 दादर-बलिया विशेष गाडीचे 11043/11044 दादर-बलिया एक्स्प्रेसमध्ये, तर 01027/01028 दादर-गोरखपूर विशेष गाडीचे 11047/11048 दादर-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. (ganapatI Special Train)


मध्य रेल्वेकडून मार्गक्षमता आणि परिचालनातील अडचणींचे कारण देत महाराष्ट्रातील काही जुन्या गाड्या सुरू करण्यास विलंब होत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, त्याच मार्गावर विशेष गाड्या सुरू करून त्या नियमित केल्या जात असतील, तर महाराष्ट्रातील बंद गाड्यांसाठी मार्गक्षमता का उपलब्ध होत नाही, असा सवाल कोकण विकास समितीने उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील जुन्या गाड्यांचेही पुनर्संचालन करून सर्व प्रदेशांना समान न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (Kokan Train)


दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील 20 अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. रायगडमध्ये 17, रत्नागिरीमध्ये दोन आणि सिंधुदुर्गातील एका ठिकाणाचा यात समावेश आहे. सणासुदीच्या काळात वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता या ब्लॅक स्पॉटवर तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल

Jalgaon Crime : जळगावात दूध विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा बडगा, ७ जणांवर कारवाई

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दुधाची मागणी वाढत असताना अनधिकृत विक्री आणि भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध