Tuesday, June 16, 2026

Goregaon Motilal Nagar Redevelopment Project : गोरेगाव मोतीलाल नगरच्या पुनर्विकास प्रकल्पात २२० झाडे बाधित

Goregaon Motilal Nagar Redevelopment Project : गोरेगाव मोतीलाल नगरच्या पुनर्विकास प्रकल्पात २२० झाडे बाधित

- पालघरमधील चहाडे गावात लावणार ४००६ झाडे लावणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगरमधील म्हाडाच्या घरांचा पुनर्विकास क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स अंतर्गत केला जात असून या नियोजित ईमारतीच्या बांधकामात तथा पुनर्विकासकामात २२० झाडे बाधित होत आहेत. यामध्ये ८९ झाडे कापली जाणार असून १३१ झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. मात्र, या बाधित झाडांच्या तुलनेत ४००६ नवीन झाडे लावली जाणार आहेत. (Goregaon Motilal Nagar Redevelopment Project)

गोरेगावमधील म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास क्लस्टर डेव्हपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत होत असून यासाठी म्हाडाच्या माध्यमातून विकासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या विकासकाच्यावतीने या इमारत पुनर्विकास प्रकल्प बाधित होणाऱ्या झाडे कापणे आणि पुनर्रोपित करणे आदींसाठी मे. शिल्प असोसिएट्स आर्कीटेक्ट यांच्यावतीने प्रस्ताव महापालिकेला सादर करण्यात आला आहे. (Goregaon Motilal Nagar Redevelopment Project)

या प्रकल्प कामांच्या ठिकाणी एकूण १७६१ झाडे अस्तित्वात असून यातील २२० झाडे ही बाधित होत आहेत. त्यात ८९ झाडे कापणे आणि १३१ झाडे पुनर्रोपित करणे अशाप्रकारे २२० झाडे कापण्यात येणार असल्याने या बदल्यात पारंपारिक पध्दतीने ४००६ एवढी झाडे ३६०३५ चौरस मीटर जागेत लावली जाणार आहेत. ही झाडे पारंपारिक पध्दतीने किंवा मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करण्यात येणार आहे. तसेच नव्याने लागवड करण्यात येणारी झाडे स्थानिक प्रजातीची असतील असे नमुद करण्यात आले आहे. हीनविन लावण्यात येणारी झाडे तथा पुनर्रोपित करण्यात येणारी झाडे मुंबई महानगर क्षेत्राअंतर्गत पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील चहाडे गाव ग्राम पंचायतच्या हद्दीत लावण्यात येणार असल्याचे हमी पत्र विकासकाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. (Goregaon Motilal Nagar Redevelopment Project)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >