मुंबई: महाराष्ट्रातील (Maharashtra) हवामानात पुन्हा मोठा बदल होत असून मान्सूनची प्रगती मंदावल्याने अनेक भागांत उष्णता आणि दमट वातावरणाचा त्रास वाढला आहे. अशात हवामान विभागाने 15 जूनसाठी राज्यातील 12 जिल्ह्यांना उष्णतेचा आणि 9 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिर जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणात उष्णता वाढणार
Pune Water Cut : पुणेकरांना मोठा झटका! आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा; धरणसाठा घटल्याने महापालिकेचा कडक निर्णय
पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी न लावल्याने आणि धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने पुणे ...
उत्तर महाराष्ट्रात उष्णता आणि हलक्या पावसाची शक्यता
नंदूरबार आणि जळगाव या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पश्चिम महाराष्ट्रात दुहेरी परिस्थिती
कोल्हापूर आणि सातारा येथे उष्णतेचा यलो अलर्ट आहे. तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज असून ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातही काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
FIFA World Cup 2026 : जर्मनीचा गोलवर्षाव! कुरासाओचा ७-१ ने धुव्वा; विश्वचषक पदार्पण करणाऱ्या संघालाही मिळाली उभे राहून दाद
फिफा विश्वचषकात चार वेळच्या विजेत्या जर्मनीने आपली ताकद दाखवत विश्वचषक पदार्पण करणाऱ्या कुरासाओचा ७-१ असा दणदणीत पराभव केला. सुरुवातीला कुरासाओने ...





