Sunday, June 14, 2026

Women T20 world cup 2026 IND vs PAK : भारताविरुद्धच्या महासंग्रामाआधी पाकिस्तानला मोठा धक्का! कर्णधार फातिमा सना दुखापतग्रस्त, खेळण्याबाबत साशंकता

Women T20 world cup 2026 IND vs PAK : भारताविरुद्धच्या महासंग्रामाआधी पाकिस्तानला मोठा धक्का! कर्णधार फातिमा सना दुखापतग्रस्त, खेळण्याबाबत साशंकता

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला १२ जूनपासून दमदार सुरुवात झाली असून क्रिकेटप्रेमींचे लक्ष आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याकडे लागले आहे. १४ जून रोजी इंग्लंडमधील एजबस्टन, बर्मिंगहॅम येथे हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. या हायव्होल्टेज सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. (Women T20 world cup 2026 IND vs PAK)

पाकिस्तान महिला (Women T20 world cup 2026 IND vs PAK) संघाची कर्णधार फातिमा सना सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाली आहे. नेट प्रॅक्टिस सुरू असताना आयेशा जफरच्या जोरदार सरळ फटक्याचा चेंडू थेट फातिमा सनाच्या उजव्या गुडघ्यावर आदळला. या घटनेनंतर ती वेदनेने त्रस्त झाल्याचे दिसून आले. सराव सत्रानंतर फातिमा लंगडत चालताना दिसली, ज्यामुळे पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.

भारताविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्याला अवघे २४ तास शिल्लक असताना कर्णधारालाच दुखापत झाल्याने पाकिस्तानच्या तयारीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. फातिमा सना ही केवळ कर्णधारच नाही, तर संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. तिच्या अनुपस्थितीचा परिणाम पाकिस्तानच्या फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांवर होऊ शकतो. (Women T20 world cup 2026 IND vs PAK)

सध्या पाकिस्तानच्या वैद्यकीय पथकाकडून तिच्या दुखापतीचे मूल्यांकन करण्यात येत आहे. मात्र, भारताविरुद्धच्या सामन्यात ती मैदानात उतरणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तिच्या फिटनेसवर अंतिम निर्णय सामना सुरू होण्यापूर्वी घेतला जाण्याची शक्यता आहे. (Women T20 world cup 2026 IND vs PAK)

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा विश्वचषकातील सर्वाधिक चर्चेचा आणि प्रतिष्ठेचा सामना मानला जातो. दोन्ही संघ विजयासाठी सज्ज असताना पाकिस्तानच्या कर्णधाराच्या दुखापतीमुळे सामन्यापूर्वीच संघावर दबाव निर्माण झाला आहे. आता फातिमा सना वेळेत फिट होते का आणि पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात उतरतो का, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. (Women T20 world cup 2026 IND vs PAK)

Comments
Add Comment