Friday, July 24, 2026

Ind vs Afg : भारत-अफगाणिस्तान मालिकेत इतिहास घडणार! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडणार

Ind vs Afg : भारत-अफगाणिस्तान मालिकेत इतिहास घडणार! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडणार

मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सप्टेंबर २०२६ मध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेचे संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे. मालिकेतील सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम येथे रोजी १३, १५ आणि १७ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. मात्र अजून बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही आहे. मालिकेत एक अशी ऐतिहासिक नोंद होणार आहे, जी याआधी कधीही झालेली नाही. (Ind vs Afg )

क्रिकेट इतिहासात कधी नाही झाले ते आता होणार!

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारी ही मालिका काही कारणांमुळे ऐतिहासिक ठरणार आहे. भारतीय भूमीवर दुसर्‍या देशाद्वारे आयोजित केली जाणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका ठरणार आहे. यापूर्वी अफगाणिस्तानने लखनऊ, डेहराडून आणि ग्रेटर नोएडा येथे आपले होम सामने खेळले असले , तरी भारतीय भूमीवर भारताच्या विरुद्ध यजमान म्हणून खेळण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारी ही मालिका सप्टेंबरमध्ये श्रीलंका दौरा सुरू असताना खेळली जाणार आहे.(Ind vs Afg )

टी-२० क्रिकेटमधील भारताची सध्याची कामगिरी

भारताने टी-२० विश्वचषक २०२६ जिंकल्यानंतर सलग दोन टी-२० मालिका गमावल्या आहेत. टी-२० विश्वचषक २०२६ नंतर सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरला कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले होते. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाने सलग दोन टी-२० मालिका गमावल्या आहेत. भारताला आयर्लंडविरुद्ध २-० आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ४-० अशा पराभवांना सामोरे जावे लागले आहे. या दोन्ही मालिकांमध्ये संघला एकही सामना जिंकता आले नाही. नंतर भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू झाली. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने सात विकेट राखून जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना शनिवार २५ जुलै २०२६ रोजी हरारे स्टेडियम येथे होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा