धर्मशाळा : हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे झालेल्या अफगाणिस्तान विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्थात वन डे इंटरनॅशनलमध्ये (ODI) भारताचा विजय झाला. पावसामुळे हा सामना २५ - २५ षटकांचा करण्याचा निर्णय झाला. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने सामना सहज जिंकला. कर्णधार असलेल्या शुभमन गिलने या सामन्यात ६६ चेंडूत २ षटकार आणि ११ चौकारांच्या जोरावर नाबाद ८४ धावा केल्या. भारताकडून शुभमननेच सर्वाधिक धावा केल्या. केएल राहुलने नाबाद ३९, ईशान किशनने ३४, रोहित शर्माने १६ आणि श्रेयस अय्यरने १२ धावा केल्या. भारताने २२.५ षटकांत ३ बाद १९५ धावा करून सामना सात विकेट्सनी जिंकला. अफगाणिस्तानकडून झिया उर रहमान शरीफीने श्रेयस अय्यरला सलीम साफीकरवी झेलबाद केले तर रशीद खानने ईशानला त्रिफळाचीत केले. रोहित शर्मा धावचीत झाला.
सिडनी : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिची ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ स्पर्धेतील विजेतेपदाची आशा उपांत्य फेरीतच संपुष्टात आली. विद्यमान ...
याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने २४.५ षटकांत सर्वबाद १९४ धावा केल्या. भारताकडून गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबेने प्रत्येकी तीन तर अर्शदीप सिंग आणि नितीश कुमार रेड्डीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरबाजने ५१ चेंडूत ८ षटकार आणि ८ चौकारांच्या जोरावर १०२ धावा केल्या. पण ही शतकी खेळी वाया गेली. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झाद्रानने एक, सेदिकुल्लाह अटलने शून्य, रहमत शाहने तीन, हशमतुल्लाह शाहिदीने २७, अझमतुल्लाह ओमरझाईने २६, मोहम्मद नबीने ९, रशीद खानने ९, एएम घझनफरने शून्य, झिया उर रहमान शरीफीने चार, मोहम्मद सलीम साफीने नाबाद एक धाव असे योगदान दिले.
मेक्सिको : सध्याचा युरोपियन चॅम्पियन असलेला स्पेनचा संघ 'फिफा विश्वचषक २०२६' जिंकण्यासाठी सर्वात प्रबळ दावेदार आहे, अशी भविष्यवाणी एका नवीन ...
अफगाणिस्तान विरुद्धची पहिली वन डे जिंकून भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना बुधवार १७ जून रोजी लखनऊ येथे एकाना स्टेडियमवर होणार आहे. यानंतर तिसरा सामना शनिवार २० जून रोजी चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
धर्मशाला : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात धर्मशाळा येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानचा डाव 24.5 षटकांत 194 धावांवर आटोपला. ...
आयसीसी वन डे रँकिंगमध्ये ११८ रेटिंगसह भारत पहिल्या स्थानी आहे तर ११३ रेटिंगसह न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान आयसीसी वन डे रँकिंगमध्ये ९३ रेटिंगसह सातव्या स्थानावर आहे.
रोहित शर्माने ओलांडला सोळा हजार धावांचा टप्पा
रोहित शर्मा अफगाणिस्तान विरूद्धच्या पहिल्या वन डे मध्ये १६ चेंडूत १६ धावा करून परतला. तो धावचीत झाला. याआधी त्याने १ षटकार आणि २ चौकार मारले. विशेष म्हणजे रोहितने आजच्याच सामन्यात सहा धावा केल्यानंतर नवा विक्रम नोंदवला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सोळा हजार धावांचा टप्पा ओलांडला. रोहित शर्माने हा विक्रम करताना वीरेंद्र सेहवाग (१५ हजार ७५८ धावा) आणि सचिन तेंडुलकर (१५ हजार ३३५ धावा) यांना मागे टाकले. सलामीवीर म्हणून रोहित शर्मा हा सोळा हजार धावांचा टप्पा पार करणारा भारताचा पहिलाच आणि एकमेव खेळाडू आहे.



