Mumbai pune housing projects : महामुंबईतील २ लाख घरांचे स्वप्न 'रखडणार'? युद्धामुळे बांधकाम क्षेत्रासमोर मोठे संकट

Mumbai : चालू वर्षात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो घरखरेदीदारांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला असून, २०२६ मध्ये पूर्णत्वास येणाऱ्या देशभरातील ५ लाख ४० हजार घरांच्या ताबा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




५७ टक्के घरे मुंबई आणि पुण्यातील


मालमत्ता बाजारपेठेतील आघाडीची सल्लागार कंपनी 'ॲनरॉक'च्या (Anarock) ताज्या अहवालानुसार, यावर्षी देशभरात विक्रमी ५ लाख ४० हजार ४०० घरे पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, युद्धाच्या सावलीमुळे प्रकल्पांना विलंब होण्याची दाट शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील ५७ टक्के घरे एकट्या महाराष्ट्र म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि पुण्यातील आहेत.




क्षेत्रनिहाय रखडणाऱ्या घरांची आकडेवारी:


मुंबई महानगर प्रदेश (महामुंबई): २ लाख ७ हजार ३०० घरे


पुणे: १ लाख ३०० घरे




युद्धाचा फटका आणि बांधकाम क्षेत्रापुढील आव्हाने


ॲनरॉक'च्या अहवालानुसार, मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचा थेट परिणाम बांधकाम साहित्यावर झाला आहे:


साहित्याचा तुटवडा: सिमेंट, स्टील आणि लोखंड यांसारख्या अत्यावश्यक बांधकाम साहित्याची वाहतूक मंदावली आहे.


किमतींत वाढ: साहित्याच्या तुटवड्यामुळे दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे.


वाहतूक खर्चाचा भार: इंधनाच्या तुटवड्यामुळे मालवाहतुकीचे दर वाढले आहेत, ज्याचा प्रकल्पाच्या एकूण खर्चावर (Cost of Project) परिणाम होत आहे.



इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती


२०२० मधील कोरोना संकटाची आठवण करून देताना अहवालात म्हटले आहे की, त्यावेळीही ४ लाख ६६ हजार घरांचे वितरण नियोजित होते, पण प्रत्यक्षात केवळ ४६ टक्केच घरे पूर्ण होऊ शकली होती. सध्याची युद्धजन्य परिस्थिती पाहता, यंदाही अशीच बिकट परिस्थिती ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


ॲनरॉकचे संशोधन-सल्लागार विभागाचे प्रमुख आणि कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले की, हे वर्ष बांधकाम क्षेत्रासाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. हे युद्ध लवकर न संपल्यास, घरांचा ताबा मिळण्यास विलंब होण्याचे प्रमाण वाढू शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान