Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता भरवणारा 'बौद्धिक' नक्षलवाद हा त्याहून अधिक धोकादायक असून, या घातक वैचारिक प्रवृत्तीविरोधात देशाला लढा द्यावाच लागेल”, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुंबईत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात उल्लेख केलेल्या 'दिमागी' नक्षलवादावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे 'वंदे मातरम्'बाबतचे धोरण, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यावरील बहिष्कार, महिला आरक्षण आणि जातिगत जनगणनेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या दुटप्पीपणाचा बुरखा फाडला.



पंतप्रधान मोदींच्या 'दिमागी नक्षलवाद' या उल्लेखावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, हिंसक नक्षलवादापेक्षा समाजात आणि विचारांमध्ये अराजकता पेरणारा वैचारिक नक्षलवाद हा अधिक चिंताजनक आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमात संपूर्ण 'वंदे मातरम्' वाजवल्याने सोनिया गांधी नाराज झाल्या. संविधानाने दिलेल्या अधिकारांतर्गत घेतलेल्या निर्णयाचा अनादर करणे आणि पूर्ण राष्ट्रगीत वा राष्ट्रीय गीतावर आक्षेप घेणे हाच 'दिमागी नक्षलवाद' आणि संविधानिक शक्तींचा अपमान असल्याचा घणाघात त्यांनी केला.


दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित मुख्य स्वातंत्र्यदिन सोहळ्याला विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अनुपस्थित राहिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खेद व्यक्त केला. फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षांचा विरोध हा भारतीय जनता पक्षाला असू शकतो, परंतु त्यांनी भारताला आणि भारतीय संविधानाला विरोध करू नये. हा सोहळा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून देशाच्या सार्वभौमत्वाचा व संविधानाचा सोहळा आहे. अशा राष्ट्रीय उत्सवाकडे पाठ फिरवून संविधानाने निर्माण केलेल्या सर्वोच्च संस्थांचा अवमान करण्याचे काम विरोधी पक्षांकडून होत आहे.


महिला आरक्षण विधेयकाबाबत पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनावर विरोधी पक्षांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांचा समाचार घेताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रहार केला. २०२३ मधील संविधान दुरुस्तीनुसार जनगणना आणि त्यानंतरची पुनर्रचना (डी-लिमिटेशन) या दोन अनिवार्य अटी समाविष्ट आहेत. विरोधकांना खरोखरच महिलांना आरक्षण द्यायचे होते, तर केंद्र सरकारने मांडलेल्या नव्या दुरुस्तीला त्यांनी पाठिंबा द्यायला हवा होता. परंतु, दोन-तृतीयांश बहुमताच्या अभावामुळे ते विधेयक फेटाळले गेले. त्यामुळे 'येडा बनवून पेढा खाणे' विरोधकांनी बंद करावे, असे सांगत २०२९ मध्ये महिलांना आरक्षण हवे असल्यास विरोधकांनी या संविधान दुरुस्तीला २/३ बहुमताने मान्यता द्यावी, असे आव्हान त्यांनी दिले.



जातीय जनगणनेत 'ओबीसीं'साठी स्वतंत्र रकाना का नाही?



  • जातीय जनगणनेत 'ओबीसीं'साठी स्वतंत्र रकाना नसल्याच्या काँग्रेसच्या आरोपांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, यापूर्वी जनगणनेत कधीही जातींचा असा स्वतंत्र रकाना नव्हता. आता अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर सर्व जातींची नोंदणी झाल्यावर एका संगणकीय आदेशाद्वारे (बंचिंग) राज्यातील प्रत्येक ओबीसी जातीची अचूक आकडेवारी समोर येणार आहे. महाराष्ट्रातून सर्वप्रथम ही मागणी करणाऱ्या छगन भुजबळ यांनीही या निर्णयाचे स्वागत केले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

  • दरम्यान, पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्यांवर बोलताना, विविध प्रशासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे या अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर तोडगा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागांची एक विशेष समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती पायाभूत सुविधांमधील तूट भरून काढेल. आगामी काळात 'इंडस्ट्रियल टाउनशिप ॲक्ट'नुसार स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करून चाकणसह पुण्यातील इतर औद्योगिक क्षेत्रांचा कायापालट करण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान

DJ Lavani Restrictions : 'डीजे'च्या तालावर होणाऱ्या अश्लील लावण्यांवर निर्बंध

- राज्य सरकारचा निर्णय; 'रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा'चे प्रमाणपत्र बंधनकारक मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध

Central Railway Headquarters : मध्य रेल्वे मुख्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न; १५ डब्यांच्या २२ नव्या लोकल सेवांची घोषणा

मुंबई: मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. राजीव श्रीवास्तव यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती शिवाजी

IBPS PO Prelims Admit Card 2026 जारी; २२ आणि २३ ऑगस्टला होणार परीक्षा, असे करा कार्ड डाउनलोड

मुंबई : बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या तयारीत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग

Devendra Fadnavis : राज्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, नदीजोड प्रकल्प वेगाने राबवणार; स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त

मुंबई : महाराष्ट्राच्या मागील आणि सध्याच्या पिढीने मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचा सामना केला आहे; मात्र येणाऱ्या