Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत



मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजाने अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पारसी नववर्ष म्हणजेच 'नवरोज' (Navroz) साजरा केला. दादर पारसी कॉलनीतील रुस्तम फ्रामना अग्यारी येथे पारसी बांधवांनी एकत्र येत विशेष प्रार्थना केली आणि नवीन वर्षाचे स्वागत केले. या प्रसंगी पारसी समाजामध्ये एकच आनंद व चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.



फारसी भाषेत 'नवरोज' या शब्दाचा अर्थ 'नवीन दिवस' असा होतो. हा सण नवी सुरुवात, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. दादरच्या प्रसिद्ध पारसी कॉलनीत पारंपरिक विधी, सामुदायिक मेळावे आणि धार्मिक अनुष्ठान पार पडले. मुंबईसह देशभरात हा सण मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.





नवरोजच्या या पवित्र प्रसंगी देशाच्या आणि राज्याच्या प्रमुख नेत्यांनी पारसी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासीयांना शुभेच्छा देताना म्हटले, “नवरोजच्या विशेष प्रसंगी हार्दिक शुभेच्छा. समृद्धी आणि आनंदाने भरलेल्या वर्षासाठी प्रार्थना. सर्वजण निरोगी राहोत आणि सर्व आकांक्षा पूर्ण होवोत. नवरोज मुबारक!”



याशिवाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही नागरिकांना नवरोजच्या गोड शुभेच्छा दिल्या. महापौर तावडे यांनी आपल्या संदेशात म्हटले की, हा सुंदर सण प्रत्येकाच्या जीवनात शांती, आनंद आणि नवीन आशा घेऊन येवो. पारसी समाजाचे बांधव नवीन कपडे परिधान करून, एकमेकांना भेटून 'नवरोज मुबारक' अशा शुभेच्छांची देवाणघेवाण करत असतात. अग्यारीमध्ये जाऊन अग्निपूजा करण्याची आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्याची ही जुनी परंपरा आहे. मुंबईतील या पारंपारिक आणि सांस्कृतिक उत्सवाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असून, या सणाने शहराच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवले आहे.




Comments
Add Comment

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

DJ Lavani Restrictions : 'डीजे'च्या तालावर होणाऱ्या अश्लील लावण्यांवर निर्बंध

- राज्य सरकारचा निर्णय; 'रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा'चे प्रमाणपत्र बंधनकारक मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध

Central Railway Headquarters : मध्य रेल्वे मुख्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न; १५ डब्यांच्या २२ नव्या लोकल सेवांची घोषणा

मुंबई: मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. राजीव श्रीवास्तव यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती शिवाजी

IBPS PO Prelims Admit Card 2026 जारी; २२ आणि २३ ऑगस्टला होणार परीक्षा, असे करा कार्ड डाउनलोड

मुंबई : बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या तयारीत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग

Devendra Fadnavis : राज्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, नदीजोड प्रकल्प वेगाने राबवणार; स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त

मुंबई : महाराष्ट्राच्या मागील आणि सध्याच्या पिढीने मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचा सामना केला आहे; मात्र येणाऱ्या