अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार असून २६ आणि २८ जून रोजी बेलफास्ट येथे दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, मालिकेला सुरुवात होण्याआधीच बेलफास्टमधील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेमुळे या सामन्यांच्या आयोजनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. (India vs Ireland T20 Series)
बेलफास्टमध्ये हिंसाचार का भडकला?
काही दिवसांपूर्वी बेलफास्टमध्ये घडलेल्या चाकू हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर स्थलांतरित समुदायाविरोधात संताप उसळला आणि अनेक भागांत हिंसक निदर्शने सुरू झाली. आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांवर हल्ले तसेच सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (India vs Ireland T20 Series)
मुंबई दि. १३ जून : पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी पुणे ...
BCCI सतर्क; सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य :
क्रिकेट आयर्लंडचा ४८ तासांचा महत्त्वाचा निर्णय :
क्रिकेट आयर्लंडनेही या घडामोडी गांभीर्याने घेतल्या आहेत. स्थानिक प्रशासन आणि प्रादेशिक क्रिकेट संघटनांशी सतत संपर्क ठेवण्यात येत असून 14 जूनपासून सुरू होणाऱ्या आयरिश सीनियर कप आणि नॅशनल कप स्पर्धांबाबत पुढील ४८ तासांत निर्णय घेतला जाणार आहे. खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि प्रेक्षकांची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले असून परिस्थितीचा सखोल आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्णय जाहीर केला जाईल. (India vs Ireland T20 Series)
Inglewood (California) : फोलारिन बालोगुनच्या शानदार दुहेरी गोलच्या जोरावर अमेरिकेने पॅराग्वेचा ४-१ असा पराभव करत घरच्या मैदानावर सुरू झालेल्या फिफा विश्वचषक ...





