Wednesday, June 10, 2026

Maharashtra Politics : राजकीय वर्तुळात खळबळ! ठाकरे गटाचे ७ खासदार शिंदेंच्या संपर्कात?

Maharashtra Politics : राजकीय वर्तुळात खळबळ! ठाकरे गटाचे ७ खासदार शिंदेंच्या संपर्कात?

मुंबई : राज्याच्या राजकारणात (Politics) पुन्हा एकदा Operation Tiger ची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील दिल्ली (Delhi) दौऱ्यानंतर उबाठा गटामधील  ७ खासदार (MPs) शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, या खासदारांपैकी एका खासदाराला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद तर इतरांना महत्त्वाची पदे देण्याची ऑफर देण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या पक्षातील खासदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) उबाठा गटाचे ९ खासदार निवडून आले होते. यामध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई, ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, राजाभाऊ वाझे, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी शिर्डी येथे झालेल्या उबाठाच्या मेळाव्याला खासदार भाऊसाहेब वाकचौरे अनुपस्थित राहिल्याने चर्चांना अधिक बळ मिळाले. विशेष म्हणजे, Operation Tiger संदर्भातील चर्चांवर वाकचौरे यांनी भाष्य करण्यास नकार दिला आहे.

यापूर्वीही उबाठा गटातील खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. एप्रिल महिन्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख उपस्थित होते. तसेच मुंबईत खासदार संजय दिना पाटील आणि एकनाथ शिंदे यांनी एकाच गाडीतून प्रवास (Travel) केल्यानेही राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, उबाठा गटाने आपल्या कोणत्याही खासदाराचा दुसऱ्या पक्षाशी संपर्क नसल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, शिवसेनेने या चर्चांवर सावध भूमिका (Cautious Stand) घेतली आहे.

Comments
Add Comment